जामखेड न्युज——
ग्रामीण आरोग्य प्रकल्पाचा स्तुत्य उपक्रम
रवीदादा आरोळे व शोभाताई आरोळे मार्गदर्शनाखाली वंचित घटकातील महिलांना रोजगार निर्मितीसाठी अगरबत्ती उद्योग सुरू
नफ्यातून वंचित घटकातील महिलांना मदत
सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या व कोरोना काळात अनेकांना आधार मिळालेल्या ग्रामीण आरोग्य प्रकल्पात रवीदादा आरोळे व शोभाताई आरोळे मार्गदर्शनाखाली वंचित घटकातील महिलांना रोजगार निर्मितीसाठी अगरबत्ती उद्योग सुरू करण्यात आला आहे त्यामुळे अनेक गोरगरीब महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या सुलताना भाभी शेख
रोहन भोसले यांनी पुणे येथे दहा दिवस अगरबत्ती बनवण्याचे प्रशिक्षण घेतले वेगवेगळ्या मशिन खरेदी केल्या व ग्रामीण आरोग्य प्रकल्पात अगरबत्ती उद्योग सुरू केला दररोज वीस किलोच्या आसपास अगरबत्ती तयार करण्यात येत आहे. अनुभवाने आणखी काम वाढणार आहे. लवकरच नैसर्गिक रित्या अगरबत्ती व धुप तयार करण्यात येणार आहे. सध्या वीस महिलांना सध्या रोजगार उपलब्ध करण्यात आला आहे. अशी मागणी सुलताना भाभी शेख यांनी दिली.
ग्रामीण आरोग्य प्रकल्पात नेहमीच वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले जातात. कोरोना काळात तर अनेकांना आधार मिळाला होता. अगरबत्ती उद्योगातून मिळणाऱ्या नफ्यातून
परिसरातील गोरगरीब लोकांना किराणा वाटप, घरखर्च भागविण्यासाठी मदत करणे असे उपक्रम राबवले जाणार आहेत. रोजगार उपलब्ध करून देणे असे विविध सामाजिक उपक्रम ग्रामीण आरोग्य प्रकल्पात राबवले जातात
चंदन, रोज, मोगरा, चमेली सर्व फेव्हर मध्ये अगरबत्ती उपलब्ध आहे. तयार अगरबत्ती साठी आमच्या कडे परदेशी पाहुणे मोठ्या प्रमाणात येतात ते आवडीने अगरबत्ती खरेदी करतात.मशीनची क्षमता पन्नास किलोची आहे. आम्ही नवीन आहोत सध्या वीस किलो अगरबत्ती तयार करतोत हळूहळू स्पीड वाढणार आहे.