यशस्वी होण्यासाठी सातत्य व अंगी शिस्त महत्त्वाची -पोलीस निरीक्षक महेश पाटील नागेश विद्यालय वतीने पोलीस निरीक्षक महेश पाटील यांचा सन्मान

0
166
  • जामखेड न्युज——

  • यशस्वी होण्यासाठी सातत्य व अंगी शिस्त महत्त्वाची -पोलीस निरीक्षक महेश पाटील

  • नागेश विद्यालय वतीने पोलीस निरीक्षक महेश पाटील यांचा सन्मान

  • सध्याचे युग हे स्पर्धेचे आहे. स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी अभ्यासात नेहमी सातत्य ठेवावे, शिस्त – स्वतःला शिस्तबद्ध ठेवावे, चालताना बोलताना शिस्तीत राहावे, सुसंस्कार – आई-वडिलांकडे आदर करावा वडीलधाऱ्यांचा मान ठेवावा , व्यायाम – ज्याची शारीरिक क्षमता चांगली आहे तो कोणत्याही परिस्थितीला सामोरे जातो आणि यशस्वी होतो चांगले आरोग्य असेल तर चांगला अभ्यास करू शकाल. असे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी सांगितले.

  • रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय मध्ये जामखेडची नूतन पोलीस निरीक्षक महेश पाटील यांचा सन्मान सोहळा व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाल्याबद्दल स्थानिक स्कूल कमिटीचा सन्मान करण्यात आला.
  • यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस निरीक्षक महेश पाटील, प्रमुख उपस्थिती नागेश विद्यालय स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य हरिभाऊ बेलेकर, कर्जत जामखेड विधानसभा अध्यक्ष कन्या विद्यालय स्कूल कमिटीचे अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात, सुरेश भोसले, विनायक राऊत ,प्रकाश सदाफुले ,प्राचार्य मडके बी के, मुख्याध्यापिका चौधरी के डी उपप्राचार्य तांबे पी ए ,पर्यवेक्षक संजय हजारे ,पर्यवेक्षक कोकाटे व्ही के, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अशोक यादव, मुक्तार सय्यद, गणेश मेंढकर ,अशोक पालकर आदी मान्यवर उपस्थित होते
  • यावेळी बोलताना महेश पाटील म्हणाले की, महापुरुषांची जयंती डी जे न लावता अभ्यास करून साजरी करावी .आम्ही पुणे विद्यापीठामध्ये अभ्यास करत असताना महापुरुषांच्या जयंती अभ्यास करून साजरी करत असत, 14 एप्रिल ला 18 तास अभ्यास करत सकाळी सहा ते रात्री बारापर्यंत अठरा तास अभ्यास करून मानवंदना दिली जायची अभ्यास संस्कार व्यायाम ज्याचे चांगले आरोग्य त्याचे चांगले मन त्याचा चांगला अभ्यास होतो एनसीसीच्या माध्यमातून शारीरिक चाचणीला आम्हाला शंभर पैकी शंभर मार्क मिळाले, सर्व शिक्षक गुरुजनाचा आदर करावा,
    सर्वांच्या सहकार्याने कार्य करण्यास आम्ही तयार आहोत
    मोबाईलचा अनावश्यक वापर करू नये,
    मोबाईलचा कमीत कमी वापर करावा
    चांगला स्पर्श वाईट स्पर्श या संदर्भात मार्गदर्शन केले. वाईट स्पर्श जर कोणी केला तर त्याची तक्रार विद्यालयात किंवा पोलीस प्रशासनाकडे लगेच करावी, शहरीपेक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शारीरिक क्षमता चांगले आहे, असे मनोगत पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केले.
  • प्राध्यापक मधुकर राळेभात यांनी विद्यालयाच्या वतीने स्वागत करून कायदा व सुव्यवस्था भक्कम राहील असे कार्य करावे. असे मनोगत व्यक्त केले.
    सूत्रसंचालन संभाजी इंगळे तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संजय हजारे यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here