जुन्या पेन्शन साठी विविध राजकीय पक्षासह संघटना व ग्रामपंचायतचा संपकऱ्यांना पाठिंबा

0
213

जामखेड न्युज——

जुन्या पेन्शन साठी विविध राजकीय पक्षासह संघटना व ग्रामपंचायतचा संपकऱ्यांना पाठिंबा

जोपर्यंत पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत कर्मचाऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा आंदोलन कर्त्यांनी दिला आज सहाव्या दिवशी संपकऱ्यांना विविध राजकीय पक्ष, संघटना व विविध ग्रामपंचायतींनी आपल्या पाठिंब्याचे पत्र दिले. तसेच तसेच प्रशासनाने दिलेल्या नोटीसांची होळी करत जाहीर निषेध व्यक्त केला.


आंदोलन कर्त्यांना अनेक संघटना व पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला आज आंदोलन स्थळी गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे, प्रा. डॉ. सुनील नरके, रत्नदिप मेडिकल फाउंडेशनचे डॉ. भास्कर मोरे, वंचित बहुजन आघाडीचे नेते
अँड. डॉ. अरूण जाधव, मनसे तालुकाध्यक्ष प्रदिप टाफरे, सनी सदाफुले, प्रा. सुनील जावळे, स्वप्नील खाडे, बापुसाहेब गायकवाड, नेताजी बाभड, काँग्रेसचे राहुल उगले, विकास राळेभात यांनी पाठिंबा दिला. तसेच विविध ग्रामपंचायतींनी पाठिंबा दिला.

संपामध्ये शिक्षक संघटना, शिक्षकेतर संघटना, आरोग्य विभाग, कृषी विभाग, महसूल विभाग, पंचायत समिती विभाग, मुख्याध्यापक संघ, उच्च माध्यमिक, हिवताप विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, समाजकल्याण विभाग, वनविभाग, पाटबंधारे विभागातील सर्वच कर्मचारी अशा सतरा संघटना सहभागी झाल्या आहेत.

 

आज तहसील कार्यालयासमोर सर्वच विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुक्यातील सर्वच शाळा बंद आहेत तर बाकी कार्यालये ओस पडलेली आहेत. आरोग्य विभागातील कर्मचारी संपावर असल्याने अनेक रूग्णांचे हाल होत आहेत.

सध्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे पंचनामा करण्यासाठी कर्मचारी नाहीत ते संपावर आहेत. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर संप मिटवावा अशी कळकळीची विनंती अनेक नेत्यांनी केली.

जामखेड तालुका कर्मचारी कृती समिती
तालुका कार्यकारणी
————————————————

१) युवराज (दादा) गोकुळ पाटील – अध्यक्ष
२) ज्ञानेश्वर रामभाऊ कोळेकर – सचिव
३) बापूराव किसन माने – मानद अध्यक्ष
४) अविनाश खंडेराव नवसरे – कार्याध्यक्ष
५) सुखदेव कल्याण कारंडे – कार्याध्यक्ष
६) प्रशांत दशरथ सातपुते – उपाध्यक्ष
७) रामहरी राजेंद्र बांगर – उपाध्यक्ष
८) पी.टी.गायकवाड – कोषाध्यक्ष
९) ज्योती साहेबराव पवार – कोषाध्यक्ष
१०) किशोर शिवाजीराव बोराडे – संघटक
११) विजयराज सुभाष जाधव – संघटक
१२) राजन बाबासाहेब समिंदर – संघटक
१३) सुरज दिलावर मुंडे – सहसचिव
१४) शारदा वसंतराव कुटे – सहसचिव
१५) शोभा चांदोबा कांबळे – सल्लागार
१६) शिल्पा साखरे – सल्लागार
१७) सुदाम वराट – प्रसिद्धी प्रमुख
१८) नितीन शिंदे – प्रसिद्धीप्रमुख
१९) प्रशांत जाधव – सन्मा. सदस्य
२०) रमेश मिठू बोलभट – सन्मा. सदस्य
२१) सुरेश आत्माराम हजारे – सन्मा. सदस्य
२२) अझरुद्दीन सय्यद – सन्मा. सदस्य
२३) उमाकांत कुलकर्णी – सन्मा. सदस्य
२४) हनुमंत गंगाराम खाशेटे – सन्मा. सदस्य
२५) संतोष छत्रभुज भोंडवे – सन्मा. सदस्य
२६) रंगनाथ विश्वनाथ जगधने – सन्मा. सदस्य

अनेक राजकीय पक्ष व संघटना सह ग्रामपंचायतींनी संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांना पाठिंबा दिला व सरकारने लवकरात लवकर संप मिटवावा अशी कळकळीची विनंती केली.

काल बोंबाबोंब आंदोलन करत आणि आलेल्या नोटीसांची होळी करत सरकारचा जाहीर निषेध करत पेन्शनची मागणी केली होती. सर्वच विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here