संजय सानप यांना आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर!!  सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव!!! 

0
130

जामखेड न्युज——

संजय सानप यांना आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर!! 

सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव!!! 

गेल्या दोन दशकाहून अधिक काळ पूर्ण वेळ लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारिता क्षेत्रात स्वतःला वाहून घेत लेखणीचे कर्तव्य करणारे पत्रकार संजय सानप यांना नुकताच दै.लोकशा चा आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

संजय सानप हे श्री क्षेत्र सौताडा येथील रहिवासी असून दैनिक लोकाशाचे पाटोदा तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात दोन दशकावून अधिक काळ कर्तव्य बजावले आहे.

समाजातील राजकीय, सामाजिक, धार्मिक, वैचारिक शैक्षणिक सांस्कृतिक आर्थिक आदीसह विविध क्षेत्रांमध्ये लेखणीच्या माध्यमातून योगदान दिले आहे. गुणवंतांना न्याय व अन्यायाला वाचा फोडताना त्यांनी पत्रकारिता केली आहे.

नुकताच त्यांना लोकाशाचा आदर्श पत्रकारीता पुरस्कार जाहीर झाला आहे. हे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दिनांक 22 मार्च 2023 रोजी बीड येथे होणार आहे.

दरम्यान, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष यांच्याकडून अभिनंदन होत आहे. पत्रकार संजय सानप यांची चिकाटी, जिद्द कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया या पुरस्काराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मुप्टा असोसिएशनचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.बिभिषण चाटे यांनी व्यक्त केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here