जामखेड न्युज——
हत्याराचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटणारी टोळी जेरबंद सात लाख रुपये हस्तगत
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे आडत व्यापा-यास हत्याराचा धाक दाखवून रस्त्यात आडवून लुटमार करणारी टोळी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आले असून आरोपी जेरबंद करत सात लाख रुपये हस्तगत केले आहेत.
प्रस्तृत बातमीतील हकीगत अशी की, यातील फिर्यादी दत्तात्रय कुंडलीक बिरंगळ वय 47 धंदा शेती व आडत रा. सोनेगांव ता. जामखेड, जि. अहमदनगर यांचा गावातील व परीसरातील शेतक-यांकडून भुसार मालाची खरेदी करुन त्याची बार्शी जि. सोलापूर येथे विक्री करण्याचा व्यवसाय आहे. दि. 15/02/2023 रोजी सायंकाळी 7.00 वा. चे सुमा. फिर्यादी व दुकानाचा हमाल गणेश कांबळे रा. सोनेगांव असे दोघे बार्शी जि. सोलापूर येथून भुसार मालाची विक्री करुन 10 लाख रुपये त्यांचे स्वत:चे मोटार सायकलवरुन घेऊन गावी येत असतांना लोहकरे वस्ती धनेगांव शिवार ता. जामखेड येथे दोन अनोळखी इसम त्यांचेकडील विना नंबरची प्लॅटिना मोटार सायकल हिचेवरुन अंगावर बुरखे घालून येऊन फिर्यादीस पाठीमागून बांबुच्या दांडक्याने मारहाण करुन व मोटार सायकल चालक गणेश कांबळे यास रोडचे दुसरे बाजूस ढकलून देऊन दोघांनी फिर्यादीस दांडक्याने मारहाण करुन हातामधील पिशवी ओढली परंतु ती न निघाल्याने त्यांचे हातातील लोखंडी कोयत्याचे उलटे बाजूने फिर्यादीचे डोक्यात मारुन जखमी करुन 10 लाख रुपये बळजबरीने चोरुन नेलेवरुन खर्डा पो.स्टे. ता. जामखेड गुरनं 44/2023 भादविक. 394,34 प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे गांभिर्य लक्षात घेऊन राकेश ओला, पोलीस अधीक्षक यांनी पोलीस निरीक्षक अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, यांना सदरचा चोरीस गेलेला पैसा हा कष्टकरी शेतक-यांचा असल्याने त्यातील आरोपींना लवकरात लवकर गजाआड करुन गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेश दिला.
पोलीस निरीक्षक अनिल कटके, पोसई/सोपान गोरे, पोसई. मनोहर शेजवळ, पोहेकॉ. सुनिल चव्हाण, बापू फोलाणे, दत्तात्रय हिंगडे, विश्वास बेरड, दत्तात्रय गव्हाणे, मनोहर गोसावी, संदीप पवार, संदीप घोडके, पोना. शंकर चौधरी, भिमराज खर्से, ज्ञानेश्वर शिंदे, दिलीप शिंदे, पोकॉ. विनोद मासाळकर, मेघराज कोल्हे, चापोहेकॉ. उमाकांत गावडे, चंद्रकांत कुसळकर, चा.पोना. भरत बुधवंत यांचे पथक तयार करुन कारवाई करणेकामी रवाना केले.
पथकातील अधिकारी व अंमलदार गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना पोलीस निरीक्षक अनिल कटके स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना माहिती मिळाली की, नमुद गुन्हयात फिर्यादी यांचेकडे काम करणारा हमाल गणेश कांबळे हा सामिल असून त्यानेच त्याचे दोन साथीदारांना फिर्यादी व तो स्वत: रोख रक्कम घेऊन येत असल्याची माहिती मिळाली. पथकाने त्यांना पाठलाग करुन जागीच पकडून त्यांना त्यांचे नांव पत्ते विचारले असता त्यांनी त्यांची नांवे (1) तुषार उर्फ सोन्या दिपक आल्हाट वय 19 रा. सोनेगांव ता. जामखेड (2) पृथ्वीराज उर्फ बबलु बाळासाहेब चव्हाण वय 20 रा. सदर (3) गणेश सुभाष कांबळे वय 19 रा. सदर असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे चौकशी करता त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना अधिक विश्वासात घेऊन व परिस्थीतीजन्य पुराव्याची जाणीव करुन दिली असता त्यांनी वरील नमुद गुन्हयाची कबूली देवून त्यांचेकडून गुन्हयातील चोरीस गेलेले रकमेपैकी 7,10,000/- रु. (सात लाख दहा हजार रुपये) रोख रक्कम व त्यांनी गुन्हयात वापरलेली मोटार सायकल जप्त करुन त्यांना पुढील कारवाईसाठी खर्डा पोलीस स्टेशनला हजर केले आहे.