जुनी पेन्शन लागू करावी म्हणून जामखेड तालुक्यातील सर्वच विभागातील कर्मचारी रस्त्यावर तालुक्यातील सर्वच शाळा बंद, इतर कार्यालयात शुकशुकाट

0
290

जामखेड न्युज——

जुनी पेन्शन लागू करावी म्हणून जामखेड तालुक्यातील सर्वच विभागातील कर्मचारी रस्त्यावर

तालुक्यातील सर्वच शाळा बंद, इतर कार्यालयात शुकशुकाट

जुनी पेन्शन योजना लागू करावी म्हणून तालुक्यातील सर्वच विभागातील कर्मचारी रस्त्यावर उतरून मोर्चा तहसील कार्यालयावर आला आणि सभेत रूपांतर झाले. यावेळी अनेक विभागातील कर्मचाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

शिक्षक संघटना, शिक्षकेतर संघटना, आरोग्य विभाग, कृषी विभाग, महसूल विभाग, पंचायत समिती विभाग, मुख्याध्यापक संघ, उच्च माध्यमिक, हिवताप विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग,

यावेळी शिक्षक नेते शिवाजीराव ढाळे, प्राचार्य श्रीकांत होशिंग, शिक्षकेतर जिल्हा खजिनदार, विजय हराळे, शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष पी टी. गायकवाड, मुख्याध्यापक संजय वराट, ईश्वर कोळी, रमेश अडसूळ, बाळासाहेब पारखे, बाजीराव गर्जे, भरत लहाने, रमेश बोलभट, मयुर भोसले, जाकिर शेख, राम निकम, ज्योती जावळे, आप्पा शिरसाठ, संतोष देशमुख, सुर्यकांत कदम, अमोल बहिर, दत्तात्रय राजमाने, बाळासाहेब कोल्हे, महसूल विभागाचे सुखदेव कारंडे, बाळासाहेब लटके, रमेश कांबळे, सतिश भोगे, ठाकरे सर, यादव सर, दिनेश शिंदे, सुनिता पिसाळ, नागरगोजे सर, विनोद सासवडकर, पांडुरंग वराट, उच्च माध्यमिक संघटनेचे तालुकाध्यक्ष विनोद धुमाळ, युवराज भोसले, राजेंद्र कोहक, बबन राठोड, कैलास वराट, नरेंद्र डहाळे, दिपक टाफरे, बाळासाहेब कावळे, प्रल्हाद साळुंके, शिरसाठ सर, शेख सर, अनिल देडे, मुकुंद राऊत, विशाल पोले, आण्णा विटकर, राजकुमार थोरवे, अशोक घोलप यांच्या सह सर्वच कर्मचारी उपस्थित होते.

आज तालुक्यातील सर्वच शाळा शंभर टक्के बंद होत्या तर सर्वच कार्यालयात शुकशुकाट होता. यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देण्यात आले.

शिवाजीराव ढाळे यांनी बोलताना सांगितले की, सर्वच कर्मचाऱ्यांनी आंदोलन गांभिर्याने घ्यावे
प्रत्येक तालुक्याने आपापला किल्ला लढवावा, शासनाला जाग आणण्यासाठी आंदोलन हेच महत्त्वाचे हत्यार आहे. सध्या अनेक पदे रिक्त आहेत तरीही पेन्शनचा हिशोब सरकार मांडतय. झारीतील शुक्राचार्य हे सचिव आहेत. मंत्र्यांचे ज्ञान उसणे आहे. त्यामुळे अडचण निर्माण होत आहे. पेन्शन हक्काची आहे ती मिळालीच पाहिजे अशी मागणी केली.

यावेळी बोलताना संजय वराट यांनी सांगितले की, सेवानिवृत्त कर्मचारी रोजंदारी करत आहेत तरी शासनाला त्याचे काही देणेघेणे नाही. आपण समृद्ध महाराष्ट्र समजतो पण कर्मचारी मात्र उपाशी आहेत.

यावेळी तहसीलदार योगेश चद्रे यांना निवेदन देण्यात आले यावेळी तहसीलदार म्हणाले की, कर्मचाऱ्यांचे निवेदन शासनाला पुरविण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here