जामखेड येथे नृतीकेची आत्महत्या!!!

0
175

जामखेड न्युज——

जामखेड येथे नृतीकेची आत्महत्या

जामखेड येथील नगर रोडवरील अंबिका कला केंद्रातील एका नृतीकेने जवळच असलेल्या एका लॉजवर छताच्या पंख्याला ओडणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दि. २८ फेब्रुवारी रोजी सकाळी सकाळी ९:३० सुमारास घडली असून रेखा सुभाष कोळी (वय ४५) मांगडेचाळ बार्शी जि. सोलापूर हल्ली मुक्काम आंबीका कला केंद्र जामखेड आत्महत्या केलेल्या नृतीकेचे नाव आहे.


सदर आत्महत्या केलेली नृतीकाही नगर रोड कृष्णा हाॅटेलच्या रूम नंबर ३ मध्ये काल दि. २७ फेब्रुवारी दुपारी २:३० पासून राहात होती. सकाळी रूम स्वच्छ करण्यासाठी त्या ठिकाणी गेलेल्या हाॅटेल मालक व या घटनेतील खबर देणार तुकाराम रामराव ढोले यांच्याशी सकाळी ८:३० च्या दरम्यान संवाद साधल्यानंतर काही वेळानंतर ही घटना घडली असावी असा अंदाज हाॅटेल कृष्णाचे मालक ढोले व्यक्त केला आहे.

सदर मयत रेखा सुभाष कोळी यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येत आहे. सदर आत्महतेचे कारण अद्याप समजले नसून या घटनेचा पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार शिवाजी बोस हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here