जामखेड न्युज——
पांडुरंग भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेस फॅन व खाऊचे वाटप
सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान जामखेड तालुका प्रमुख पांडुरंग मधुकर भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महादेव गल्ली येथे चार सिलिंग फॅन व सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करत एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
पांडुरंग भोसले यांनी आतापर्यंत गोशाळेस मोठ्या प्रमाणावर मदत, श्री साकेश्वर गोशाळेचे पालकत्व, कोरोना काळात गोरगरीब लोकांना जेवनाचे डबे पुरवणे तसेच शहरातील रस्ते, वीज, पाणी या सुविधा मिळण्यासाठी नेहमीच झटत असतात गोरगरीब लोकांना मदतीसाठी नेहमीच आघाडीवर असतात. तसेच दिपावली काळात आपली संस्कृती टिकून राहावी मुलांनी मोबाईल महाजालातून बाहेर पडून किल्ले बनवावेत म्हणून किल्ले बनवा स्पर्धा घेतात तसेच दरवर्षी गड किल्ले मोहिम आयोजित करतात. दरवर्षी शिवपट्टन खर्डा येथे किल्यावर साफसफाईचे काम तसेच दीपोत्सव आयोजित करतात अशा अनेक प्रकारचे काम नेहमीच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असते वाढदिवसाच्या निमित्ताने अनावश्यक खर्च टाळून शाळेत फँन व मुलांना खाऊ वाटप केले आहे.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशीद, सामाजिक कार्यकर्ते जैन कॉन्फरन्सचे संजय कोठारी, मनसे तालुकाध्यक्ष प्रदीप भाऊ टापरे, जिल्हा परिषद शाळा महादेवगल्ली मुख्याध्यापिका- श्रीम सुमन पाडळे, बालाजी चव्हाण सर, संजय घोडके सर, भाऊ मैत्री, गणेश जोशी, उत्कर्ष कुलकर्णी, भाऊ पोटफोडे, उमेश पवार, सुंदर पवार गणेश काळे, विशाल पठाडे, अमोल पाचंग्रे, बाळू ढाळे, खंडागळे नाना आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मनसेचे प्रदीप भाऊ टापरे यांनी उत्कर्ष कुलकर्णी यांनी पांडुरंग भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेस 4 सिलिंग फॅन दिल्याबद्दल अभिनंदन केले. पांडू राजांचे कार्य अतिशय निस्वार्थी आणि निखळ असून ते सतत इतरांना सहकार्य करत असतात व कोविड महामारीच्या काळात पांडूराजांनी अतिशय समाजहिताचे उत्कृष्ट कार्य केले. कोणतीही अपेक्षा न ठेवता ते निस्वार्थ भावनेने सर्वांना मदत करत असतात. असे मनोगत व्यक्त केले.
संजय काशीद यांनी वाढदिवसाच्या अनावश्यक खर्च टाळून असेच सामाजिक कार्य पुढे चालू ठेवावे असे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी पांडुरंग भोसले यांचे कार्य निस्वार्थी भावनेने करत असतात. शाळेला फॅन दिले हा उपक्रम विद्यार्थ्यांचा हिताचा आहे शुभेच्छा दिल्या. सर्वांनी असे उपक्रम करावे असे आवाहन केले. यावेळी उपस्थित मान्यवर शिक्षक व विद्यार्थ्यांनी पांडुरंग भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.