जामखेड न्युज——
जामखेडमध्ये दीड लाखाची आँनलाईन फसवणूक
‘हॅलो, मी बँकेचा आधिकारी बोलतोय’, मोबाईलवरून दिड लाखांची केली ऑनलाईन फसवणूक
मी मंबई येथिल ब्रांद्रा बँकेचा कर्मचारी बोलत आहे असे मोबाईलवर सांगुन फीर्यादीचा विश्वास संपादन केला. यानंतर फीर्यादीच्या क्रीडेट कार्ड व बँकेच्या खात्यातील एकुण दिड लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली.
या प्रकरणी आरोपीने मोबाईलवर सांगितलेल्या नावावरून दिपक वर्मा, रा. एस.बी.आय बँकेचे मुख्य ऑफीस मंबई याच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी रामचंद्र अभिमन्यू शिंदे रा. शिक्षक कॉलनी, बीड रोड, जामखेड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले म्हटले आहे की दि ११ व १२ फेब्रुवारी २०२३ रोजी मला ८९१०९४८९५८ या मोबाईल क्रमांकावरून फोन आला व समोरुन मी मंबई येथिल ब्रांद्रा बँकेचा कर्मचारी बोलत आहे आसे सांगितले. तसेच फीर्यादीस वारंवार फोन करुन क्रीडेट कार्ड आपडेट करायचे आहे आसेही सांगितले. यानंतर ओटीपी घेऊन फीर्यादीस प्ले स्टोअर येथून अँप डाऊलोड करावयाचे सांगुन लिंक वर क्लीक करायला सांगितले.
यानंतर फीर्यादीच्या क्रीडेट कार्ड वरुन ९९ हजार ७४५ रुपयांची खरेदी केली तसेच बँकेच्या खात्यावरील ५६ हजार ८२२ रुपये काढुन घेतले. असे एकुण फीर्यादी ची ऑनलाईन १ लाख ५६ हजार ५६७ रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला दि १७ फेब्रुवारी रोजी संबंधित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सा.पो.नि सुनील बडे हे करत आहेत.
चौकट
अमुक बॅंकेच्या मुख्यालयातून बोलतोय तासाभरात तुमचे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड किंवा एटीएम कार्ड बंद पडणार आहे. ते बंद होऊ द्यायचे नसेल तर व्हेरिफिकेशन करावे लागेल, असे फोन आले तर विश्वास ठेवू नका. बॅंका असे फोन कधीच करीत नाहीत. तसा फोन आला तर लगेच बँकेत जाऊन चौकशी करावी. आजचे गुन्हेगार हे हायटेक झाले आहेत. ते गुन्हा करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहेत. त्यामुळे शक्यतो फोनवरून आपल्या बँक खात्याची माहिती कोणालाही देऊ नये व आपली फसवणूक टाळावी.
(संभाजी गायकवाड, पोलीस निरीक्षक, जामखेड)