जामखेड न्युज——
सर्वसामान्यांना मदत होईल असे काम करावे – तहसीलदार योगेश चंद्रे
ल.ना.होशिंग विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती संपन्न.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांनी अतिशय उत्कृष्ट अशा कार्यपद्धतीने काम केले. आपणही जीवन जगत असताना आपल्या परीने सर्वसामान्यांना जास्तीत जास्त मदत होईल,चांगल्या कृतीवर भर देऊनच काम केलं पाहिजे. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिलेली शिकवण ही आजच्या काळामध्ये ही अतिशय उपयुक्त आहे. असे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी व्यक्त केले.
ल.ना.होशिंग माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय जामखेड मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री श्रीकांत होशिंग व प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार श्री योगेश चंद्रे साहेब उपस्थित होते. त्याचबरोबर नायब तहसीलदार श्री मनोज भोसेकर साहेब, उपमुख्याध्यापक श्री रमेश अडसूळ, पर्यवेक्षक श्री बाळासाहेब पारखे,ज्येष्ठ शिक्षक श्री शहाजी वायकर, श्री प्रवीण गायकवाड,शिक्षक प्रतिनिधी रोहित घोडेस्वार उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आजपासून दिनांक 19 फेब्रुवारी 2023 पासून राज्य गीत म्हणून मान्यता मिळालेले गर्जा महाराष्ट्र माझा हे राज्य गीत सर्वांनी गाऊन कार्यक्रमाची सुरुवात अतिशय छान अशी झाली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूजनानंतर विद्यार्थ्यांनीही अतिशय छान रित्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर अतिशय सुंदर असे गीत मुलींनी सादर केले.
सुरुवातीला पर्यवेक्षक श्री बाळासाहेब पारखे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील विविध प्रसंग व त्यावर त्यांनी अतिशय कल्पकपणे काढलेले मार्ग श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल सविस्तर अशी माहिती मनोगता मधून दिली.
त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री श्रीकांत होशिंग साहेब यांनी सुरुवातीला विद्यार्थ्यांकडून मोठ्या आवाजात घोषणा म्हणून घेऊन संपूर्ण वातावरणामध्ये एक जोश निर्माण केला त्यानंतर आपल्या मनोगत मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आदर्श राजा त्यांनी दिलेली शिकवण व संस्कार विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी करून अभ्यासाच्या माध्यमातून स्वतःची, कुटुंबाची,गावाची निश्चित प्रगती करावी असा संदेश दिला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साई भोसले,आदित्य देशमुख,सुरज गांधी,हनुमंत वराट विजय क्षिरसागर, विशाल पोले, बबन राठोड, मुकुंद राऊत,पोपट जगदाळे, भरत लहाने, राघवेंद्र धनलगडे सर्वांनी परिश्रम घेतले. महिला अध्यापिका श्रीमती संगीता दराडे, सुप्रिया घायतडक,वंदना अल्हाट, पूजा भालेराव,प्रभा रासकर, सुरेखा धुमाळ,देविका फुटाणे,रेश्मा कारंडे,प्रियंका सुपेकर,महिला अध्यापिका ही उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अनिल देडे व आभार प्रदर्शन उपमुख्याध्यापक श्री रमेश अडसूळ यांनी केले.