जामखेड न्युज——
डॉ. संजय भोरे यांच्या प्रयत्नातून माॅडेल स्कूल जिल्हा परिषद देवदैठण शाळेसाठी टँब व साॅफ्टवेअर संचविद्यार्थ्यांना मिळणार डिजिटल शिक्षण
जामखेड तालुक्यातील देवदैठण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची माॅडेल स्कूल योजनेत निवड झाल्यामुळे देवदैठण जि. प. शाळेला डिजिटल लायब्ररी स्कूल मधून २० टॅब व साॅफ्टवेअर संच मिळणार आहेत. यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांना अधुनिक व डिजीटल शिक्षण घेता येणार आहे. या प्रकारे जामखेड तालुक्यातून माॅडेल स्कूल म्हणून निवड झालेल्या दोन शाळांपैकी एक असलेल्या दैवदैठण शाळेची या योजनेत निवड व्हावी म्हणून दैवदैठण येथील रहिवासी असलेले सनराईज एज्युकेशन फौडेंशन जामखेड या शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय भोरे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे, माजीमंत्री आ. प्रा राम शिंदे व खा. सुजय विखे यांचेकडे पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्यास यश येऊन माॅडेल स्कुल म्हणून निवड झाल्याने आता विविध प्रकारचे साहित्य या शाळेला मिळत आहे.
देवदैठण या ठिकाणी जिल्हा परिषदेची सातवीपर्यंत, एका खासगी संस्थेची आठवी ते दहावीपर्यंत तर सनराईज शैक्षणिक संकुल पाडळी फाटा या संस्थेचे ज्युनियर कॉलेज आहे. या संस्थांमुळे येथील मुलांना चांगल्या शैक्षणिक सुविधा निर्माण झाल्या आहेत.
आपल्या सनराईज शैक्षणिक संकुल पाडळी फाटा या संस्थेच्या माध्यमातून तालुक्यातील पाडळी फाटा, कुसडगाव व देवदैठण याठिकाणी विविध शैक्षणिक शाखांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलांना चांगल्या शैक्षणिक सुविधा निर्माण करून देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असणारे डॉ. संजय भोरे यांनी आपल्या गावातील मुलांसाठी चांगल्या शैक्षणिक सुविधा मिळाव्यात यासाठी पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे, आ. प्रा. राम शिंदे व खा. सुजय विखे यांच्या माध्यमातून जामखेड तालुक्यातून एकमेव आपले गांव देवदैठण हे जिल्हा नियोजनातून माॅडेल स्कूल योजनेत बसवले त्यामुळे देवदैठण जि. प. शाळेला मिळणार डिजिटल लायब्ररी स्कूल मधून २० टॅब व साॅफ्टवेअर संच मंजूर करण्यात आले आहेत.
याबद्दल ना. राधाकृष्ण विखे, आ. राम शिंदे खा. सुजय विखे यांचे ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त केले जात आहेत. डॉ. संजय भोरे हे दैवदैठण गावाच्या विकासासाठी पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे, माजी मंत्री आ. राम शिंदे व खा. सुजय विखे यांच्या नेहमीच संपर्कात असतात.