जामखेड न्युज——
चिमुकल्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून महाराष्ट्रात प्रथमच विविध गुणदर्शन स्पर्धा – ज्योती बेल्हेकरजामखेडमध्ये एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या माध्यमातून विविध गुणदर्शन स्पर्धा
शालेय स्तरावर विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात मात्र अंगणवाडी मधील चिमुकल्या मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने महाराष्ट्रातील प्रथमच जामखेडमध्ये एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या माध्यमातून विविध गुणदर्शन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मुलांच्या कलागुणांमुळे अंगणवाडी कडे बघण्याचा पालकांचा दृष्टीकोन बदलला असे मत बाल विकास अधिकारी ज्योती बेल्हेकर यांनी व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, प्रमुख पाहुणे तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुनिल बोराडे, बालविकास प्रकल्प अधिकारी ज्योती बेल्हेकर, पर्वक्षीका कांबळे मॅडम, संतोष सरसमकर, पत्रकार अविनाश बोधले, अशोक वीर, किरण रेडे सह तालुक्यातील सर्व आंगणवाडी सेविका सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ म्हणाले की, चिमुकल्या मुलांच्या कलागुणांना वाव देण्याचे काम बालविकास प्रकल्प अधिकारी बेल्हेकर मँडम यांनी केले आहे हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात यावा सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
एकात्मिक बालविकास प्रकल्प सेवा योजना जामखेडच्या वतीने चिमुकल्या मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने बालविकास प्रकल्प अधिकारी ज्योती बेल्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील प्रथमच जामखेड येथे शुक्रवार दि १७ रोजी तालुका स्तरावरीय विविध गुणदर्शन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. याचे उद्घाटन जामखेडचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुनिल बोराडे व प्रकल्प अधिकारी ज्योती बेल्हेकर मॅडम यांच्या हस्ते संपन्न झाले.
शालेय मुलांच्या कलागुणांना वाव मिळतो मात्र चिमुकल्या मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा या मुख्य उद्देशाने महाराष्ट्रात प्रथमच अंगणवाडी मधिल मुलांसाठी या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मुलांनी कथा, गोष्टी, आभंग, पोवाडे, भाषण, वेशभूषा सह विविध नृत्य सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. या विविध गुणदर्शन स्पर्धेत जामखेड तालुक्यातील अडीचशे ते तीनशे स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. सहभागी स्पर्धकांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. परीक्षक म्हणून संतोष सरसमकर व पत्रकार अविनाश बोधले यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मनोज कांबळे यांनी केले.