जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – ( सुदाम वराट)
कोरोना रूग्णांवर औषधोपचारासह चहा नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय करणार्या आरोळे कोविड सेंटरमधील पाचशे रूग्णांना व अंतरवली येथील वृद्धाश्रमातील वृद्धांना आज झुंबरलालजी रतनचंदजी गांधी यांच्या स्मरणार्थ शितलकुमार संजय गांधी परिवारातर्फे मिष्ठान्न भोजन देण्यात आले
यावेळी जामखेडचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड , सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, जैन श्रावक संघाचे अध्यक्ष कांतीलाल कोठारी, भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष अमोल तातेड, मिलन कांकरिया, प्रफुल्ल सोलंकी, गणेश भळगट, संदेश कोठारी, शीतल गांधी ,राहुल गांधी हिम्मत गांधी,संजय गांधी शितल सोळंकी ,सचिन फिरोदिया,महावीर बाफना,मिथुन बाफना, योगेश भंडारी,संकेत कोठारी, आशिष चोरडिया,मनोज भंडारी ,गणेश लुंकड़, पवन कांकरिया ,अनिल फिरोदिया, मंगेश बेदमुथा ,शुभम राऊत, शुभम उदारे,अभय सिंगवी,आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड म्हणाले की,
जैन समाजाची सर्वांनी प्रेरणा घ्यावी महावीर जयंती कार्यक्रमानिमित्त बोलत होते. भगवान महावीर जन्म कल्याणक ( महावीर जयंती) चे औचित्य साधुन आणी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या प्रेरणेने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
Advertisement

जामखेड येथील आरोळे कोवीड सेंटर येथील कोरोना 500 रुग्णांना स्व. झुंबरलालजी रतनचंदजी गांधी यांच्या स्मरणार्थ शितलकुमार संजय कुमार गांधी यांच्या परिवारातर्फे मिष्ठान्न भोजन देण्यात आले. तसेच अंतरवली फाटा येथील वृद्धाश्रमात तीस वृद्धांना मिष्ठान्न भोजन आणि किराणा शितल संजय गांधी यांच्यामार्फत देण्यात आले आहे.
महावीर जयंती निमित्त अनिल केशरमल फिरोदिया यांचा मार्फत आरोळे मोफत कोविड-सेंटर येथे सकाळी चहा- नाश्ता आणि औषधाचा बॉक्स देण्यात आले.
त्यानंतर महावीर जयंतीनिमित्त प्रवीण मंडलेचा जवळा यांनी किराणा माल दिला आहे .
यावॆळी जामखेड़ महावीर बाफना, अभय शिगवी, योगेश भंडारी, अमित बोथरा, प्रवीण बाफना आदनी 60 बिसलरी पाण्याचे बॉक्स दिले आहेत.