जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
सध्या कोरोना महामारीने जगात थैमान घातले आहे. खाजगी हाॅस्पिटलमध्ये लाखो रुपये खर्च करूनही योग्य उपचार मिळत नाहीत. परिसरातील कोरोना रूग्णांवर औषधोपचारासह चहा नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय करत आतापर्यंत पाच हजारांहून अधिक रूग्ण ठणठणीत बरे होईल घरी परतले आहेत. ना रेमडेसिवीर ना महागडे औषधे सर्व काही मोफत उपचार करणार्या आरोळे कोविड सेंटर सध्या डॉ. रवी आरोळे व डॉ. शोभा अरोळे हे बहिण भाऊ चालवतात आपल्या आई – वडिलांचा समाजसेवेचा वसा समर्थ पणे चालवतात त्यामुळे परिसरातील खरे समाजसेवक व देवदूत आरोळे बहिण भाऊ आहेत.

देशभरात रेमडेसिवीरसाठी रांगा लागत आहेत. एकेका रूग्णांचे बिल लाखो रुपयांपेक्षा अधिक होत आहे. तरीही रूग्ण दगावण्याचे प्रमाण वाढत आहे. मात्र येथील अरोळे पॅटर्न जरा वेगळाच आहे. आरोळे यांच्या ज्युलीया कोवीड सेंटरमध्ये कोरोना रूग्णासाठी ना रेमडेसिवीर इंजेक्शन वापरले जाते ना महागडी औषधे तरीही येथील रूग्ण ठणठणीत बरे होतात. सध्या हॉस्पिटलची पायरी चढायला लाखो रुपये मोजावे लागतात अशा वातावरणात जुलिया हॉस्पिटलमध्ये मात्र एक रूपया न देता रूग्ण ठणठणीत बरे होऊन जात आहेत हे विशेष !
रेमन मॅगेसेस पुरस्कारप्राप्त दिवगंत डॉ. रजनीकांत आरोळे व मेबल रजनीकांत आरोळे यांची कन्या डॉ. शोभा अरोळे व डॉ. रवी आरोळे हे जामखेड येथे ग्रामीण विकास प्रकल्पांतर्गत जुलिया हे हॉस्पिटल चालवितात. शेतकरी व सामान्य लोकांची कोरोनाच्या नावाखाली खाजगी हॉस्पिटलमधून होणारी लूट व त्यांच्यावर शेतजमिनी विकण्याची वेळ येऊ नये म्हणून आपले आरोळे हॉस्पिटलचे कोवीडमध्ये रूपांतर करून मोफत औषधोपचार सुरू केला. यामुळे डॉ. अरोळे कोवीड हॉस्पिटल जामखेड करासाठी देवदूत ठरले आहे. या बहिण भावंडानी आपल्या आईवडिलांनी १९७२ च्या दुष्काळात आरोळे यांच्या मार्फत दुष्काळी कामे करत लाखो लोकांना भुकबळी पासून वाचविले लोकांना कामे दिली त्याकाळी रस्ते तयार केले मोफत आरोग्य सेवा दिली तसेच किल्लारी भुकंपाच्या वेळी आरोळे हॉस्पिटलची आरोग्याचे पथक किल्लारी परिसरात पाठवून आरोग्य सेवा केली होती. १९७२ पासूनच दुष्काळापासून जनतेची विनामूल्य केलेली सेवा व त्यावेळी ५५ गावात सुरू असलेले आरोग्याचे नेटवर्क अजूनही या भावंडांनी कायम ठेवून मोफत उपचार सुरू ठेवले आहेत.
Advertisement

रेमडेसिवीर व एचआरसीटी हे सध्या फॅड आले आहे लोकांनी याबाबत मानसिकता बदलण्याची गरज आहे. रूग्णाचा नेमका आजार काय आहे आणी काय द्यावे याबाबत आम्ही हु ( WHO) आणि इंडियन कौन्सिल मेडीकल रिसर्च (ICMR) ने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वाचे पालन करून औषधांचा वापर केला आहे आहे त्यामुळे रूग्ण बरे होत आहे. दुसरा आलेला स्ट्रेन घातक आहे त्यामुळे शासनाच्या सुचनाचे पालन व स्वच्छता राखली तर आपल्याला कोरोना हात लावू शकणार नाही असे परखड मत डॉ. अरोळे कोवीड हॉस्पिटलचे संचालक डॉ. शोभा व रवी अरोळे यांनी व्यक्त केले.
डॉ. अरोळे कोवीड सेंटरमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर न करता मागील वर्षभरात ३७०० रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले त्यावेळी मृत्यूदर हा एक टक्का होता. या हॉस्पिटलची रूग्ण क्षमता १५० होती आमदार रोहीत पवार यांच्या पुढाकाराने या ठिकाणी जवळपास एक हजार रूग्णावर उपचार होऊ शकतात असे सेंटर या परिसरात उभे केले आहे. जनतेची मदत, व आ. रोहीत पवार यांच्या मदतीमुळे तसेच हॉस्पिटल स्वतः दररोज खर्च करून रूग्णावर उपचार केले जात आहेत. आता कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे १ मार्च ते २० एप्रिल पर्यंत १३५० रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या ६५० रूग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.
Advertisement

डॉ. अरोळे भावंडानी दैनिक सामनाशी बोलताना सांगितले की सध्या कोरोनाचा दुसरा स्ट्रेन घातक आहे आऊटब्रेक आहे एकाच घरात यापूर्वी दोन तीन रूग्ण निघत असे आता संपूर्ण घरातील लोक, गल्लीतील परिसर किंवा संपूर्ण गाव संक्रमीत होत आहे. यापूर्वी पाच ते नवव्या दिवशी रूग्ण बरा होऊन घरी जात होता आता मात्र काही क्रिटीकल रूग्ण बरा होण्यासाठी १५ ते २१ दिवसाचा कालावधी लागत आहे. तसेच कोरोना रोगाचे लक्षणे बदलले आहे यामुळे काळजी घेण्याची गरज आहे. कोरोना हा फफुसावर अँटक करतो यामुळे फफुसावर सुज येते त्यामुळे रक्तातील आक्सिजन कमी होतो व रूग्णाला आँक्सीजन देणे गरजेचे होते. रुग्णांवर उपचार करताना त्याला काय होते ते पाहून व फफुसावरील सुज कमी होईल यानुसार उपचार करणे आवश्यक आहे. १०० रूग्णांत २० रुग्णात अतिसंवेदनशील परस्थिती असते त्यातील ५ टक्के रूग्णाला रेमडेसिवीर देण्याची गरज असते पण आता मात्र रूग्ण, नातेवाईक व डॉक्टर स्वतः रेमडेसिवीरची मागणी पाण्या सारखी करतात त्यांची मानसिकता अशी झाली की रेमडेसिवीर दिले तर रुग्ण बरा होईल ही मानसिकता बदलणे आवश्यक आहे.
कोरोनाचा दुसरा स्ट्रेन असला तरी आम्ही हु आणि इंडियन मेडिकल कौन्सिल यांच्या सुचनेवरून औषधांचा मात्रा तयार केला आहे व रूग्णाची परस्थिती पाहून त्यांना औषधे देऊन उपचार करीत आहोत केवळ महागडी औषधे व बरे झाल्यानंतर भविष्यात रूग्णावर होणारे साईड इफेक्ट्स पाहता काय त्या औषधाचा उपयोग ? असा सवाल सवाल करत डॉ. रवी अरोळे म्हणाले कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे तो इतर आजराप्रमाणे आहे मात्र यामध्ये भिती जास्त दाखवली जाते या भितीपोटी रूग्ण आपली मानसिकता बदलतो हा आजार झाला म्हणजे मी जगणार नाही त्यातून रेमडेसिवीरची मागणी केली जात आहे.
रेमडेसिवीर प्रमाणेच एचआरसीटीची फॅड आले आहे यापूर्वी हायड्रोक्लोरीक गोळ्याचे फॅड आले होते त्यावेळी त्याचा तुटवडा जाणवला होता तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताकडे या गोळ्या मागीतल्या होत्या यामुळे या औषधाला मागणी येऊन काळाबाजार झाला होता तसेच एन ९५ मास्क सुरक्षित आहे असे फॅड आले होते सर्वजण तीच मागणी करत होते आपले सामान्य कापडी मास्क पण चांगले असतात हे समजावून घ्यायला
आहे. एचआरसीटी करून रुग्णाचा स्कोअर काढला जात आहे व उपचार केले जात आहे हे पण एक फॅड झाले आहे रूग्णाचा स्कोर त्याला माहीत झाला तर तो आणखी काळजी करतो त्यामुळे तो औषधाला दाद देत नाही स्कोर पाहून उपचार करण्यापेक्षा त्या रूग्णाला कशाची गरज आहे ते पाहून उपचार करणे व रुग्णांत आत्मविश्वास निर्माण करणे आवश्यक आहे. ब्लड टेस्ट, अँटीजेन व आरटीपिसीआर या टेस्ट करून उपचार करावेत ९० टक्के लोक साध्या गोळ्या औषधाने बरे होतात पण त्यांना रूग्णालयात किंवा घरी सुविधा असेल तर तेथेच उपचार घेऊन दहा ते पंधरा दिवस इतरांबरोबर संपर्क न केल्यास संक्रमण कमी होईल व दोन तिन महिन्यात हॉस्पिटलची गरच लागणार नाही.
चौकट
आरोळे कोविड सेंटर मध्ये आतापर्यंत जवळपास सव्वापाच हजार लोक बरे झाले आहेत तेही मोफत त्यामुळे
अरोळे कोवीड हॉस्पिटलला आता मदतीची आवश्यकता आहे दररोज ८० आँक्सीजन सिलेंडर लागतात त्यासाठी दररोज ५० हजार मोजावे लागत आहेत दररोज ६५० रूग्णाला जेवण, नाष्टा, औषधे दिली जात आहे. रुग्णांनी किमान आता आँक्सीजनचे पैसे देणे गरजेचे आहे. आम्ही आत्ता अर्थिक संकटात आहोत. हे सर्व आपल्याच सहकार्यावर अवलंबून आहे. तेव्हा प्रत्येकाने आपल्या ऐपतीप्रमाणे भाजीपाला, किराणा, आॅक्सिजन सिलेंडर, रोख पैसे अशा स्वरूपात मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहेत.