जामखेड न्युज——
श्री.नाथ महाराज यात्रेनिमित्त लावणी, गायन व नृत्याच्या मैफिलीचा अनोखा महोत्सव नायगाव मध्ये साजरा होणार – संध्या सोनवणे.
जामखेड तालुक्यांतील नायगावचे ग्रामदैवत श्री.नाथ महाराज यात्रा निमित्त लाखोच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात त्यांच्यासाठी व गावकऱ्यांसाठी राष्ट्रवादी पुणे विभागीय अध्यक्ष व नायगाव ग्रामपंचायत सदस्या संध्या सोनवणे याच्या वतीने नायगाव महोत्सवचे आयोजन 19 फेब्रुवारी 2023 होणार आहे.
सालाबाद प्रमाणे नायगावचे ग्रामदैवत श्री.नाथ महाराज यात्रा निमित्त नायगाव ग्रामपंचायत सदस्या संध्या सोनवणे यांचा अयोजनाने नायगाव मध्ये नायगाव महोत्सव साजरा होणार असुन त्यासाठी खास जामखेड तालुक्यांत प्रथमच सूर नवा ध्यास नवा उपविजेती व “पाव्हण जेवलात काय” फेम राधा खुडे यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे
तसेच लावणी साम्राटणी सुरेखाताई पुणेकर यांच्या लावणीचा गायन व नृत्य मैफिलीचा अनोखा महोत्सव होणार असुन यात्रेला व कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संध्या सोनवणे यांनी केले आहे.