जामखेड न्युज——
शासनाच्या नियमानुसार शिवजयंती साजरी करावी – पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड
शिवजयंती व महाशिवरात्र महोत्सव शांततेत शासनाच्या नियमानुसार साजरे करावेत, धार्मिक तेढ निर्माण होईल असे वक्तव्य कोणीही करू नये, पारंपरिक वाद्य वाजवावेत, ट्रॅफिक जाम होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी केले.
आज दिनांक 17/ 2/ 2023 रोजी जामखेड पोलीस स्टेशन येथे शांतता समिती, जातीय सलोखा तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती यांची शिवजयंती अनुषंगाने शांतता मिटिंग घेतली. मीटिंग मध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती, महाशिवरात्री अनुषंगाने खालील प्रमाणे योग्य त्या सूचना दिल्या आहेत.
1)कोणीही धार्मिक तेढ निर्माण होईल असे देखावे किंवा वक्तव्य करणार /दाखवणार नाही.
2) दुसऱ्या धर्माच्या भावना दुखावतील असे वाद्य किंवा गाणे वाजवणार नाहीत.
3)छत्रपती शिवाजी महाराज जयंती मिरवणूक वेळेस वाद्य पारंपारिक असावीत.
4)शासनाचे परिपत्रक नुसार शिवजयंती साजरी करण्यात यावी.
5)मिरवणूक दरम्यान ट्रॅफिक जाम होणार नाही यासाठी आपले स्तरावर स्वयंसेवक उपस्थित ठेवावेत.
शिवजयंती करिता असणार तगडा बंदोबस्त पुढीलप्रमाणे
1)पोलीस उपअधीक्षक-01
2)पोलीस निरीक्षक-01
3)स पो नि/पोसई-03
4)पोलीस अंमलदार-30
5)महिला पोलीस-05
6)स्ट्रायकिंग फोर्स-01
7)होमगार्ड-40
8)पोलीस मित्र -10
असा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
या व इतर सर्व सूचना देण्यात आल्या आहेत.
मिटींगला प्रा. मधुकर राळेभात, दत्तात्रय वारे, विनायक राऊत, मंगेश आजबे, पांडुरंग भोसले, प्रदीप टापरे, विकी सदाफुले, राहुल उगले, सनी सदाफुले, शामिर सय्यद, ताहेर खान ,अतिष पारवे, दिगंबर चव्हाण, लक्ष्मण ढेपे, समीर चंदन, आकाश साठे, प्रकाश काळे, अमित जाधव, प्रकाश सदाफुले, रमेश कांबळे महसूल प्रतिनिधी, पांडुरंग शिंदे,नवनाथ गव्हाणे,पंढरीनाथ शिकारे असे
शांतता समिती सदस्य जातीय सलोखा समिती, शिवजयंती उत्सव समिती,पोलीस मित्र व महसूल विभागाचे प्रतिनिधी असे 35 ते 40 लोक हजर होते. मिटिंगचे आयोजन पोलीस नाईक अविनाश ढेरे व पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश जाधव गोपनीय शाखा यांनी केले होते.