जामखेड न्युज——
सेव्हन फिटनेस क्लबच्या यशात महिलांचा मोठा वाटा – सुमित वराट
सेव्हन फिटनेस क्लबचा दुसरा वर्धापनदिन उत्साहात साजरा.
सेव्हन फिटनेस क्लबच्या माध्यमातून परिसरातील महिलांसह नागरिकांना आपल्या आरोग्याचे महत्त्व समजले आहे त्यामुळे यामुळे दोन वर्षात जामखेड बरोबर बीड जिल्ह्यातील पाटोदा व पुणे जिल्ह्यातील दौंड येथे शाखा सुरू केल्या आहेत याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या यशात महिलांचा वाटा मोठा आहे असे मत सेव्हन फिटनेस क्लबचे संचालक सुमित वराट यांनी सांगितले.
दोन वर्षांची यशस्वी वाटचाल पुर्ण करत जामखेड चा सेव्हन फिटनेस क्लबने दुसर्या वर्षात पदार्पण केले. याच निमित्ताने नुकताच द्वितीय वर्धापन दिन
महिलांच्या हस्ते केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी महिलांच्या हस्ते केक कापून वर्धापन दिन साजरा केला. वर्धापन दिनानिमित्त सेव्हन फिटनेस क्लब मध्ये येणार्या नागरीकांनसाठी खास ऑफर देण्यात आली होती. तसेच या सेवन फिटनेस क्लबचा जामखेड सह पाटोदा, दौंड या ठिकाणी देखील शाखा आहेत. विषेश म्हणजे आमच्या सेव्हन फिटनेस क्लब ला महिलांचा जीमला येण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. अशी माहिती सेव्हन फिटनेस क्लबचे संचालक सुमित वराट यांनी दिली.
यावेळी नवीन मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका मीना राळेभात म्हणाल्या की, सध्याच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक महिलांनी आपल्या आरोग्यकडे लक्ष देण्यासाठी फिटनेस क्लब जाँइन करावा एक तास तरी आपल्या आरोग्यासाठी द्यावा जामखेड शहरात अत्याधुनिक सेवा सुविधांनी युक्त सेव्हन फिटनेस क्लब आहे त्यामुळे या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन राळेभात यांनी केले.
यावेळी बिभीषण मामा धनवडे, रमेश वराट, प्रा.
कैलास माने, दादासाहेब सरनोबत, सुरज बरे, अजय कात्रजकर, अजय चव्हाण, राणा सदाफुले, सह सेव्हन फिटनेस क्लबचे सभासद व महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.