जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – ( सुदाम वराट )
कोरोना रूग्णांवर औषधोपचारासह चहा नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय करणार्या आरोळे कोविड सेंटर मधुन आतापर्यंत जवळपास सव्वापाच हजार कोरोना रूग्ण कोरोना रूग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत. सर्व खर्च आरोळे कोविड सेंटरने तसेच परिसरातील लोकांनी केलेल्या मदतीवर हा खर्च केलेला आहे त्यामुळे आरोळे कोविड सेंटरला परिसरातील दानशूर व्यक्तींना मदतीचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे यांनी केले होते त्याला प्रतिसाद मिळत असुन जिल्ह्याबाहेरून म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्य़ातील पाथरूड येथील प्रविण पोते यांनी
आरोळे कोविड सेंटरला एकवीस हजार रुपयांची मदत केली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे यांनी तालुक्यात मोठय़ा प्रमाणात धान्य, भाजीपाला व रोख रक्कम जमवून आरोळे कोविड सेंटरला मदत केलेली आहे. आज उस्मानाबाद जिल्ह्य़ातील भूम तालुक्यातील पाथरूड येथील प्रवीण धनाजी पोते यांनी एकवीस हजार रुपये आरोळे कोविड सेंटरला मदत केली आहे.
विशेष म्हणजे गेल्या वर्षीही एकवीस हजार रुपयांची मदत त्यांनी केली होती.
मदतीची रक्कम आरोळे कोविड सेंटरचे संचालक डॉ. रवी आरोळे यांच्याकडे सुपूर्द केली यावेळीी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले, सुधीर पांडुरंग जाधव, नितीन महादेव खोबरे, केशव जनक तिकटे यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
परिसरातील कोरोनाग्रस्त लोकांना आरोळे कोविड सेंटर एक आधार ठरत आहे. आतापर्यंत जवळपास सव्वापाच हजार कोरोना रूग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत तेही अगदी मोफत हा सर्व खर्च आरोळे कोविड सेंटर करत आहे. त्यामुळे दानशूर व्यक्तींना मदतीचे आवाहन करण्यात आले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे यांनी तालुक्यातुन धान्य, भाजीपाला व रोख स्वरूपात मदत आरोळे कोविड सेंटरला केलेली आहे. त्यांनी तालुक्यातून तर मदत गोळा केलीच पण तालुक्याबाहेरून व जिल्ह्याबाहेरूनही मंगेश आजबे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मदतीचा ओघ सुरू झाला आहे आज पाथरूड ता. भूम जि. उस्मानाबाद येथिल
प्रविण पोते यांनी गेल्या वर्षी एकवीरा हजार रुपये व याही वर्षी एकवीस हजार रुपयांची मदत आरोळे कोविड सेंटरला केली आहे. मदतीबद्दल डॉ. रवी आरोळे यांनी सर्वाचे आभार मानले.