जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
करोना रूग्णांवर औषधोपचारासह चहा नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय करणार्या आरोळे कोविड सेंटर मध्ये सध्या सातशे रूग्ण उपचार घेत आहेत तसेच कोरोनाची अॅटिजेन व आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी अनेक लोक याठिकाणी येतात. कोरोना रूग्णांना भेटायलाही लोक येतात यामुळे मोठय़ा प्रमाणावर गर्दी होते यातच अनेक दुचाकी व चारचाकी वाहने ही मोठ्या प्रमाणावर असतात. लोकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळावे गर्दी करू नये वाहने सुरळीतपणे पार्किंग करावेत यासाठी पोलीस हेडकॉन्स्टेबल शिवाजी भोस व राहुल हिंगसे पोलिस कॉन्स्टेबल हे आपले कर्तव्य बजावत आहेत.

जामखेड तालुक्याला कर्तव्यदक्ष पदाधिकारी आमदार रोहित पवार यांच्या रुपाने मिळाले आहेत व त्यांना साथ तहसीलदार विशाल नाईकवाडे, पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड, जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांची लाभलेली आहे. हे अधिकारी व पदाधिकारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. व कोरोना रूग्णांना चांगली सेवा उपलब्ध होण्यासाठी परिश्रम घेत आहेत. या सर्वांना मोलाची साथ आहे ती आरोळे कोविड सेंटरची येथील डॉक्टर, परिचारिका, वार्ड कर्मचारी, या सर्वांना नाष्टा व जेवण बनवणारे कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत.
आरोळे कोविड सेंटरमधून आजपर्यंत सुमारे साडेपाच हजार रूग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत तेही अगदी मोफत. सधसध्या आरोळे कोविड सेंटर मध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी असते सातशे रूग्ण त्यांना भेटायला आलेले नातलग, तसेच कोरोना चाचणी साठी आलेले रूग्ण यामुळे गर्दी मोठी असते या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे म्हणून पोलीस हेडकॉन्स्टेबल शिवाजी भोस व पोलीस काॅन्स्टेबल राहुल हिंगसे हे आपले कर्तव्य बजावत आहेत.