कर्जत जामखेडसाठी तीस बस मिळाव्यात – आमदार रोहित पवार

0
158

जामखेड न्युज——

कर्जत जामखेडसाठी तीस बस मिळाव्यात – आमदार रोहित पवार

कर्जत व जामखेड तालुक्यासाठी राज्य परिवहनच्या नव्या 30 बसेस मिळण्याबाबत आ. रोहित पवार यांनी केली मुख्यमंत्र्यांना विनंती; मुख्यमंत्र्यांनी तात्काळ परिवहन सचिवांना प्रस्ताव सादर करण्याचे दिले आदेश

विद्यार्थी व प्रवाशांची होत असलेली गैरसोय होणार दूर

कर्जत बस आगाराचा प्रश्न हा गेल्या 20 ते 25 वर्षांपासून प्रलंबित होता. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर रोहित पवार यांनी दीड वर्षात तो मार्गी लावला. तसेच जामखेड येथील बस स्थानक पुनर्बांधणी व परिसरात व्यापारी गाळे बांधकाम देखील सध्या सुरू आहे. दोन्हीचं काम सध्या पूर्णत्वास जात आहे. त्यामुळे धोरणाप्रमाणे जेव्हा डेपोचं हे काम विशिष्ट टक्केवारीच्या पुढे जातं, तेव्हा बसेसची मागणी करावी लागते. जेणेकरून त्या संबंधित डेपोला बसेस उपलब्ध करून दिल्या जातात. याच अनुषंगाने आता हे काम ७० टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले आहे. तसेच विद्यार्थ्यांची व प्रवाशांची संख्या देखील अधिक असल्याने बसेसची कमतरता भासत आहे. अशातच कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन कर्जत व जामखेड तालुक्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या नव्या बसेस उपलब्ध करून देण्याबाबत विनंती केली आहे.

नुकतीच मुंबईत आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मतदारसंघातील प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा व दोन्ही तालुक्याच्या परिवहनाची होणारी अडचण दूर करण्यासाठी दोन्ही तालुक्यांना मिळून 30 नवीन बसेस देऊन सहकार्य करावे अशी विनंती केली आहे.

सदरील विनंतीवर तात्काळ कार्यवाही करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिवहन सचिवांना प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर प्रक्रिया पुर्ण होऊन बसेस उपलब्ध झाल्यास त्याचा नक्कीच कर्जत-जामखेडकरांना फायदा होईल. कोरोना असतानाही आमदार रोहित पवार यांनी अवघ्या दीड वर्षात कर्जतला डेपो मंजूर करून आणला, तसेच भरघोस निधी देखील महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर करून आणला. त्याचं काम आता पूर्णत्वास जात आहे. अशातच विद्यार्थ्याची आणि प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून अधिक बसेस मिळाव्यात ही विनंती मुख्यमंत्र्यांकडे आमदार रोहित पवार यांनी केल्यामुळे आता गेल्या अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित विषय या माध्यमातून मार्गी लागत असल्याचे दिसून येत आहे.

प्रतिक्रिया – (चौकट)

कर्जत आगाराचा जो विषय 25 वर्षे प्रलंबित होता तो महाविकास आघाडी सरकार असताना पहिल्याच वर्षांमध्ये कर्जतला डेपो मंजूर मार्गी लावला त्याचे 70 टक्के काम आता पूर्ण झाले आहे. त्यानंतर आता बसेसची कमतरता असल्याने विद्यार्थी आणि प्रवाशांची मोठी गैरसोय लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे अधिकच्या बसेसबाबत विनंती केली. या संदर्भात तातडीने सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केलं.

– आमदार रोहित पवार
(कर्जत-जामखेड विधानसभा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here