जामखेड न्युज——
बाळासाहेबांच्या शिवसेनेत तीघांचा प्रवेश, प्रा. कैलास माने (सर) व सुमित वराट यांच्या प्रयत्नानांना यश

शिवसेना तालुकाप्रमुख प्रा. कैलास माने सर व युवासेना प्रमुख सुमित वराट यांच्या नेतृत्वाखाली जामखेड मध्ये जोरदार काम सुरू आहे अनेक सामाजिक प्रश्न हाती घेऊन कामाचा धडाका सुरू केला आहे. याच कामावर खुश होत शहरासह तालुक्यातील अनेक युवक बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत.

युवासेना तालुकाप्रमुख सुमित वराट यांनी ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण यानुसार कामकाज सुरू आहे. तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत असलेल्या दुरावस्थेवर फोकस करत जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्याचा चंग बांधला आहे. या कामाचा धडाका पाहून अनेक युवक शिवसेनेत प्रवेश करत आहेत.

जामखेड येथिल जामखेड कॉम्प्लेक्स या ठीकाणी नुकतीच बाळासाहेब ठाकरे यांची ९७ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ओम जाधव, सुरज साळुंके, गणेश साळुंके या तरुणांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत बाळासाहेबांची शिवसेना तालुकाप्रमुख प्रा. कैलास माने (सर) व युवा सेनेचे तालुका अध्यक्ष सुमित वराट यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला.

या वेळी बाळासाहेबांची शिवसेना तालुका प्रमुख कैलास माने (सर) जामखेड युवासेना तालुका प्रमुख सुमित वराट, शहरप्रमुख देविदास भादलकर, योगेश यादव, हसन तांबोळी, शाहरुख शेख, विशाल खवळे, ऋषिकेश जाधव, प्रेम जाधव, तुषार वेताळ, शुभम जाधव, रोहित बुद्धीवंत, प्रज्वल राळेभात, गोपाल पवार, अथर्व शिंदे, श्रवण घायतडक, प्रताप साळुंके, सार्थक पिंपळे, प्रशांत धोत्रे, प्रतिक लिमकर, अरफाद बागवान, सागर कांबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी युवा सेनेचे तालुका अध्यक्ष सुमित वराट यांनी बोलताना बोलताना सांगितले की लवकरच बाळासाहेबांच्या शिवसेनेत जामखेड तालुक्यातील आनेक गावातील तरुण वर्ग संपर्कात असुन ते देखील या शिवसेना पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती दिली.


