जामखेड न्युज——
आजचे शिक्षण व तणावमुक्ती या विषयावर माजी शिक्षण संचालक दिनकरराव टेमकर यांचे व्याख्यान
संवाद परिसंवाद, पुस्तक प्रकाशन व व्याख्यान संमारभात शिक्षण क्षेत्रातील दिग्गज आपल्या भेटीला

जामखेड येथिल जिव्हाळा फाऊंडेशनच्या पुढाकारातून होत असलेल्या संवाद परिसंवाद, पुस्तक प्रकाशन व व्याख्यान समारंभाची पर्वणी जामखेडकरांना अनुभवायला मिळणार असून दि. २७ जानेवारी रोजी होणाऱ्या या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. यात आजचे शिक्षण व तणावमुक्ती या विषयावर माजी शिक्षण संचालक दिनकरराव टेमकर यांचे व्याखयान होणार आहे.

जामखेड येथील भारतरत्न ए. पी. जे अब्दुल कलाम सभागृह .ना. होशिंग विद्यालय येथे शुक्रवार दि. २७ जानेवारी २०२३ रोजी सांय ४.०० वा होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात तर प्रमुख पाहुणे म्हणून भिवंडी येथील न्यायाधीश सुदाम श्रीराम काळे, तहसिलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, दि. पिपल्स एज्युकेशनल सोसायटीचे उपाध्यक्ष अरुण चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच माजी शिक्षण संचालक दिनकर टेमकर, पुणे महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी पोपटराव काळे, आदर्श शिक्षक मनोहर इनामदार यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

तर या कार्यक्रमाचे निमंत्रक गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे, ल. ना. होशिंग विद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत होशिंग, मेरा धरती सुरज परिवाराचे संतोष पवार, विश्वदर्शन न्युजचे संपादक गुलाब जांभळे, जिव्हाळा फाऊंडेशन जामखेड हे असून या कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रकाश पेरणाऱ्या शिक्षण अधिकाऱ्यांचे काजवा या आत्मकथनाच्या विक्रमी यशानंतर लेखक आपल्या भेटीला “सृजन नागरिकांशी काजवाकार पोपटराव काळे यांचा संवाद परिसंवाद ” त्याच बरोबर आदर्श शिक्षक मनोहर इनामदार यांचे “गवसणी” या पुस्तकाचे प्रकाशन त्या निमित्त आजचे शिक्षण व त्यावर तणावमुक्ती या विषयावर माजी शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांचे व्याख्यान आयोजित केलेले आहे.तरी कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.


