जामखेड न्युज——
जामखेडला क्रीडा संकुल उभारावे – प्रकाश काळे
अदिवासी पारधी महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश काळे यांच्या वतीने आमदार रोहित पवारांचा सत्कार
आमदार रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोशिएसन बोर्डच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जामखेड येथे अदिवासी पारधी महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश काळे यांच्या वतीने आमदार रोहित पवार यांचा सत्कार करण्यात आला.
आमदार रोहित (दादा) पवार यांनी ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी क्रीडा संकुल उभा करावी ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून कर्जत जामखेडचे नाव राज्यात अग्रेसर राहिल असे मत अदिवासी पारधी महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश काळे यांनी व्यक्त केले.
यावेळी राष्ट्रवादीचे कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात, तालुका अध्यक्ष दत्तात्रय वारे, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र पवार, प्रकाश सदाफले, वैजिनाथ पोले, सुर्यकांत मोरे, शहराध्यक्ष राजेंद्र गोरे, उमर कुरेशी, शरद शिंदे, नगरसेवक दिगांबर चव्हाण, मोहन (वस्ताद )
पवार, पवन राळेभात, रमेश आजबे, युवा नेते महेंद्र राळेभात, महेश राळेभात, इस्माईल सय्यद, समीर चंदन, हरिभाऊ आजबे, डॉ. नरसाळे, पिंटू बोरा, सचिन शिंदे, ऋषि कुंजीर, महेश यादव, इम्रान तांबोळी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.