खेमानंद इंग्लिश स्कूल मध्ये बालआनंद मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न राजुरीच्या सरपंच अश्विनी सागर कोल्हे यांचा सत्कार संपन्न

0
198

जामखेड न्युज——

खेमानंद इंग्लिश स्कूल मध्ये बालआनंद मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न

राजुरीच्या सरपंच अश्विनी सागर कोल्हे यांचा सत्कार संपन्न

विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील मनावरील असलेला अभ्यासक्रमाचा मानसिक ताण तणाव दूर करुन विरंगुळा मिळावा व त्यांच्यातील अंगीकृत सुप्त कलागुणांना वाव देता यावा या उद्देशाने जामखेड येथील खेमानंद इंग्लिश स्कूल मध्ये बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या आनंद सोहळ्याचा विद्यार्थ्यांसह पालक व ग्रामस्थांनी आनंद घेतला.

खेमानंद इंग्लिश स्कूल जामखेड येथे दि. २० रोजी बाल आनंद मेळावा व हळदीकुंकू समारंभाचे उद्घाटक म्हणून जामखेड न्यायालयाचे न्यायाधीश वैभव जोशी त्यांच्या पत्नी सौ. मिनल ज्योशी, राजुरीच्या सरपंच अश्विनी सागर कोल्हे, संस्थेचे उपाध्यक्ष विजय पवार व सचिव सतिश शिंदे, प्राचार्य शिवानंद हलकुडे सह अनेक पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बालआनंद मेळाव्याचा सर्व विद्यार्थी व पालकांनी मनमुराद आनंद लुटला यावेळी माता पालकांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.

राजुरीच्या लोकनियुक्त सरपंच अश्विनी सागर कोल्हे यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. न्यायाधीश जोशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष विजय पवार व सचिव सतिश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here