जामखेड न्युज——-
आमदार प्रा राम शिंदे यांच्यावर भाजपाने सोपविली मोठी जबाबदारी
आमदार प्रा. राम शिंदे यांची भाजपा प्रवक्ते पदी नियुक्ती
भाजपाने येणाऱ्या सर्वच निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी केलेली दिसून येत आहे यासाठी नऊ प्रवक्ते तर 31 पॅनेलिस्ट सदस्य यांच्या नियुक्ती करण्यात आली आहे. यात माजी मंत्री आमदार प्रा राम शिंदे यांची प्रवक्ते पदी नियुक्ती करण्यात आली आहे यामुळे कर्जत जामखेड तालुक्यातील भाजपा कार्यकर्ते यांच्यात आनंदाने वातावरण आहे.

भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपा प्रदेश मीडिया विभाग पदाधिकारी यांची घोषणा केली. श्री नवनाथ बन यांच्याकडे माध्यम प्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली असून श्री केशव उपाध्ये मुख्य प्रवक्ते तर श्री. विश्वास पाठक आणि श्री.अजित चव्हाण हे ‘सह-मुख्यप्रवक्ते’ राहतील. त्याचबरोबर 9 प्रवक्ते पुढीलप्रमाणे आहेत.

1. आ.प्रा.राम शिंदे (प्रवक्ता)
2. आ. राम कदम (प्रवक्ता)
3. आ. अमित साटम (प्रवक्ता)
4. श्री. भालचंद्र शिरसाट (प्रवक्ता)
5. श्री. शिवराय कुलकर्णी (प्रवक्ता)
6. श्रीमती श्वेता शालिनी (प्रवक्ता)
7. श्री. गणेश खणकर (प्रवक्ता )
अॅड. राजीव पांडे (प्रवक्ता)
9. कु. प्रेरणा होनराव (प्रवक्ता)
या 9 जणांची प्रवक्ते पदी नियुक्ती करण्यात आली आहे.




