घरकुल योजनेत जामखेड तालुका जिल्ह्यात प्रथम तर नगर जिल्हा राज्यात अव्वल

0
206

जामखेड न्युज——

घरकुल योजनेत जामखेड तालुका जिल्ह्यात प्रथम तर नगर जिल्हा राज्यात अव्वल

संपूर्ण राज्यभरात 20 नोव्हेंबरपासून महाआवास योजनेत अभियान राबवलं जात आहे . या अभियानांतर्गत टप्पे ठरवून त्या टप्प्यांवर घरकुलाचे कामे पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. राज्यभरातील घरकुलांच्या कामांना गती देण्याचा याद्वारे सरकारचा प्रयत्न आहे. अहमदनगर जिल्ह्याने या अभियानात राज्यातील इतर जिल्ह्यांना मागे सारत मागच्या 56 दिवसात उल्लेखनीय कामगिरी केल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये नगर जिल्ह्यात कर्जत व जामखेड तालुक्यात वाखण्याजोगे काम झाले असल्याचे पाहायला मिळते त्यात जामखेड तालुक्यात 56 दिवसांत 710 घरकुलाचे काम पूर्ण झाले असून जामखेड तालुका जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे तसेच कर्जत तालुक्यात 56 दिवसात 585 घरकुलाचे काम पूर्ण झाले आहे.

लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यात योग्य समन्वय असेल तर नक्कीच अशा पद्धतीची उल्लेखनीय कामगिरी करता येते याचं उत्तम उदाहरण कर्जत-जामखेड मतदारसंघात पाहायला मिळत आहे. कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार नागरिकांशी वेळोवेळी संवाद साधून, सरकारी योजनेची माहिती नागरिकांपर्यंत पोचवण्यासाठी कायमच प्रयत्नशील असतात. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून कर्जत व जामखेडमध्ये बैठका घेऊन त्यांनी वेळोवेळी प्रश्न मार्गी लावले तसेच नागरिक आणि अधिकारी यांच्या वारंवार संपर्कात राहून व शासकिय पातळीवर केंद्र सरकारकडेही याबाबत पाठपुरावा केला होता.

2021-2022 या वर्षात पंतप्रधान आवास योजनेतून जामखेडमध्ये एकूण 2225 घरकुलाचे उद्दिष्ट्य होते. त्यापैकी 2222 घरकुले मंजूर झाली त्यापैकी 1040 घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. तसेच कर्जत तालुक्यात 2180 घरकुलांचे उद्दिष्ट होते त्यापैकी 2168 घरकुल मंजूर होऊन 821 घरकुलांचे काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे. तसेच रमाई आवास योजनेच्या माध्यमातून दोन्ही तालुक्यात एकूण मंजूर 901 घरकुलांपैकी तब्बल 202 घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. अशा पद्धतीने कर्जत जामखेड मतदारसंघाने नगर जिल्ह्यात आपला वरचष्मा कायम ठेवला असल्याचं सिद्ध झालं आहे. मागच्याच वर्षी घरकूल योजनेत जामखेडचा नाशिक विभागीय स्तरावर दुसरा क्रमांक देखील आला होता आणि यंदाच्या वर्षी जामखेड नगर परिषदेने घरकुल योजनेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला होता. तसेच ही आकडेवारी पाहिल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे स्थानिक आमदार रोहित पवार व प्रशासकीय अधिकारी प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत आणि त्या दृष्टीने आता त्याचे फळ देखील मिळत असल्याचे दिसून येतेय.

चौकट

अधिकारी, नागरिक, पदाधिकारी, सरपंच व सर्व लोकप्रतिनिधी या सर्वांना विश्वासात घेऊन काम केल्यानंतरचं फळ या आकडेवारीच्या माध्यमातून बघायला मिळतंय याचा मनापासून आनंद आहे. या प्रमाणेच येत्या काळातही मी लोकांच्या हितासाठी कायमच काम करत राहीन.

– रोहित पवार
(आमदार कर्जत जामखेड विधानसभा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here