साहित्यिक आ. य. पवार यांना गगाईबाबाजी राज्य पुरस्कार

0
162

जामखेड न्युज——

साहित्यिक आ. य. पवार यांना गगाईबाबाजी राज्य पुरस्कार

  • जामखेड येथील प्रसिद्ध साहित्यिक प्रा.आ.य.पवार यांच्या वाड्मयीन कार्यासाठी आष्टी जि.बीड येथील
    शेतकरी शिक्षण संस्थेचा या वर्षीचा गंगाईबाबाजी राज्य पुरस्कार घोषित करण्यात आल्याची माहिती पुरस्कार समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ दत्तात्रय वाघ यांनी दिली.


माजी आमदार भीमराव धोंडे संचलित शेतकरी शिक्षण संस्थेतर्फे राज्य स्तरीय गंगाईबाबाजी आदर्श पुरस्कार साहित्य, क्रीडा,कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी प्रती वर्षी दिले जातात.यावर्षिचे साहित्य क्षेत्रातील पुरस्कार प्रा.आ.य.पवार यांना जाहीर झाला आहे.


कवी पवार यांच्या कविता नांदेड, नागपूर, अमरावती, मुंबई विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमासाठी असून, त्यांचा’ धूळपेर ‘ काव्यसंग्रह कर्नाटक विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमात शंभर गुणांसाठी नेमलेला आहे. ग्रामीण साहित्यातील पहिले विज्ञान कवी म्हणून समीक्षकांनी त्यांचा गौरव केला आहे.त्यांच्या निसर्ग व विज्ञान कवितेवर मुंबई विद्यापीठात राज्य पातळीवर, तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा नांदेड विद्यापीठात राष्ट्रीय पातळीवर चर्चा सत्र संपन्न झाले आहे.

दोन प्राध्यापकांनी त्यांच्या कवितावर एम.फिल केले आहे. गंगाईबाबाजी पुरस्कार वितरण
२०/१/२३ रोजी आष्टी येथे डॉ.आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ , औरंगाबादचे मराठी विभाग प्रमुख डॉ.दासू वैद्य, प्रसिद्ध अभिनेत्री डॉ निशिगंधा वाड, माजी आमदार भीमराव धोंडे, प्राचार्य डॉ.दत्तात्रय वाघ व शेतकरी शिक्षण संस्थेचे संचालक मंडळाच्या उपस्थितीत होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here