Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या वडिलांच्या स्मरणार्थ किरण वर्पे यांनी केली स्मशानभूमीत पाण्याची सोय

वडिलांच्या स्मरणार्थ किरण वर्पे यांनी केली स्मशानभूमीत पाण्याची सोय

0
201

जामखेड न्युज——

वडिलांच्या स्मरणार्थ किरण वर्पे यांनी केली स्मशानभूमीत पाण्याची सोय


जामखेड तालुक्यातील जवळा येथील स्मशानभूमीत पाण्याची गैरसोय दूर करण्यासाठी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ ज्योती क्रांती मल्टीस्टेट सोसायटीचे सचिव किरण वर्पे यांनी स्वखर्चाने जवळा स्मशानभूमी येथे पाण्याची सोय करून दिली आहे.

ज्योती क्रांती पतसंस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात तसेच संस्थेचे संचालक मंडळ व कर्मचारी यांनीही हा वसा घेत अनेक सामाजिक उपक्रम राबवतात. स्मशानभूमी पाण्याची अडचण ओळखून पाण्याची सोय केली आहे.

जवळा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार व दशक्रिया विधीच्या वेळी नागरिकांना पाण्याची अडचण येत होती. या स्मशानभूमीत जवळा पंचक्रोशीतील नागरिकांच्या वतीने दशक्रिया विधी केले जातात. परंतु या ठिकाणी पाण्याची कुठलीही सोय नव्हती. दशक्रिया विधीसाठी नातेवाईकांना पाण्याचे ड्रम मोटरसायकलवर घेऊन यावे लागत असत. यामुळे नागरिकांची कुचुंबना होत होती. ही कुचुंबना परत होऊ नये म्हणून ज्योती क्रांती सोसायटीचे सचिव किरण वर्पे यांनी आपले वडील कै. पंढरीनाथ वर्पे यांच्या स्मरणार्थ त्यांचे दशक्रिया विधीच्या वेळी जवळा ग्रामपंचायतला पाण्याची टाकी व संरक्षण शेड लोकार्पण केले.

यावेळी ज्योती- क्रांती सोसायटीचे चेअरमन आजिनाथ हजारे, व्हाईस चेअरमन दशरथ हजारे, संचालक मारुती रोडे, भीमराव हजारे, राजेंद्र राऊत, उद्योजक व गावचे सरपंच सुभाष शिंदे, किसन मेहर (गुरुजी), मुरलीधर हजारे, सह नातेवाईक, मित्रपरिवार, जवळा पंचक्रोशीतील नागरिक यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!