तालुकास्तरीय गणित विज्ञान प्रदर्शनात श्री साकेश्वर विद्यालयाचे घवघवीत यश महादेव मत्रे यांना आदर्श गणित शिक्षक पुरस्कार प्रदान

0
233

जामखेड न्युज——

तालुकास्तरीय गणित विज्ञान प्रदर्शनात श्री साकेश्वर विद्यालयाचे घवघवीत यश

महादेव मत्रे यांना आदर्श गणित शिक्षक पुरस्कार प्रदान

तालुक्यातील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय जवळा येथील तालुकास्तरीय ४७ व्या विज्ञान, गणित व पर्यावरण प्रदर्शनात श्री साकेश्वर विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांनी घवघवीत यश संपादन केले याबद्दल विद्यालयात त्यांचा सन्मान करण्यात आला. 

पंचायत समिती जामखेड तालुका विज्ञान, गणित व पर्यावरण प्रदर्शनात श्री साकेश्वर विद्यालयातील गणित शिक्षक महादेव मत्रे यांनी गणित शैक्षणिक साहित्य प्रदर्शनात सादर केले होते यात त्यांचा शिक्षक गटात द्वितीय क्रमांक पटकावला तसेच सहा ते आठ गटात विद्यालयातील विद्यार्थीनी लक्ष्मी लहू वराट हिने नैसर्गिक स्त्रोतांचा वापर व प्रदुषण टाळणे या उपक्रमासाठी तृतीय क्रमांक आला तसेच शाळेतील सात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

गणित विज्ञान प्रदर्शनात विद्यालयातील पाचवीतील प्रितम गौतम पवार गणित विषयातील चुंबकाच्या साहाय्याने सम विषम संख्या ओळखणे तसेच पृथ्वीराज बाळासाहेब वराट यांने फँन उपक्रम बनवले होते. तर सहावीतील सिद्धी गणेश मुरूमकर हिने गणितीय गुणाकार उपक्रम, तसेच सहावीतील सार्थक रमेश मुरूमकर विज्ञान विषयात पाणचक्की उपक्रम सादर केले तर प्रज्ञा केशव मुरूमकर आठवी हिने विज्ञानचे ज्वालामुखीचा उद्रेक हे उपक्रम सादर केले होते.

तर 9 ते 12 गटात नववीतील वंदना राजेंद्र वराट हिने गणित विषयातील संख्या चाळणी हे उपक्रम सादर केले होते या सर्व विद्यार्थ्यांनी आपले उपक्रम सादर केले होते.

गणित शिक्षक महादेव मत्रे शिक्षक गटात
गणित शैक्षणिक साहित्य उपक्रम सादर केले होते यामध्ये शिक्षक गटात त्याचा द्वितीय क्रमांक आला तसेच तालुक्यातील आदर्श गणित शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला तर लक्ष्मी वराट हिच्या उपक्रमास तृतीय क्रमांक आला याबद्दल गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे, अहमदनगर महानगरपालिका नगरसेविका आशाताई शिवाजी कराळे, श्रीनिवास कराळे, बंडोपंत पाटील, उदयकुमार दाहितोंडे, 
केंद्रप्रमुख किसन वराट, सुरेश कुंभार, प्राचार्य श्रीकांत होशिंग, सोमनाथ उगले,मुख्याध्यापक बाळासाहेब जोरे, दत्ता काळे, संजय वराट, श्रीराम मुरूमकर, दशरथ कोपनर, मंगेश आजबे, बबन मिसाळ, पवन राळेभात, संदीप ओझा, राजकुमार थोरवे, सुदाम वराट, शहाजी पाटील, अर्जुन रासकर, अशोक घोलप, त्रिंबक लोळगे, सुलभा लवुळ, सुचिन वराट,विजय हराळे, अतुल दळवी, आण्णा विटकर, शैला मत्रे, बापू जरे, दिनेश शिंदे, बाबुलाल नजन, शिवप्रसाद पाटील, निलम उगले,आप्पासाहेब ढगे, युवराज मत्रे, रमेश अडसूळ, पी. टी. गायकवाड, शहाजी वायकर, भरत लहाने, राजेंद्र उदावंत, किशोर कुलकर्णी, वैष्णवी मुरूमकर, रामहरी गंडाळ, ढमाळ सर यांच्या सह अनेकांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here