जामखेड येथील राजमाता जिजाऊ नगरमध्ये जिजाऊ जयंती उत्साहात साजरी

0
161

जामखेड न्युज—–

जामखेड येथील राजमाता जिजाऊ नगरमध्ये जिजाऊ जयंती उत्साहात साजरी


हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चातुर्य, चरित्र्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सद्गुणांचे बाळकडू देणाऱ्या राजमाता जिजाऊंची जयंती जामखेड येथील जिजाऊ नगरमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी वसीम भाई, मोहन जाधव, तोडकर दादा, गणेश कदम, बजरंग सरडे, सागर अंदुरे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

जामखेड बस स्थानकासमोर खाडे नगरची कमान होती परिसरातील सर्वच नागरिकांनी काही वर्षापूर्वी एकत्र येऊन या भागाला जिजाऊ नगर नामकरण केले तसेच राजमाता जिजाऊ नगर असा फलक लावला आणी नंतर दरवर्षी जिजाऊ जयंतीला प्रतिमा पूजन करण्यात येते. आजही जयंती निमित्त प्रतिमा पूजन करून जिजाऊ माँ साहेबांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

राजमाता जिजाऊ नगरमधील नागरिक दरवर्षी जिजाऊ जयंती उत्साहात साजरी करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here