जामखेड न्युज——
शंभूराजे कुस्ती संकुलाच्या वतीने महिलांच्या हस्ते जिजाऊ जयंती, 140 रक्तदात्यांनी केले रक्तदान
रक्ताचा थेंब कोणाचातरी जीव वाचवू शकतो
आधुनिक काळात रक्ताची नितांत गरज असते हे ओळखून शंभूराजे कुस्ती संकुलाच्या माध्यमातून मंगेश आजबे यांनी गेल्या पाच वर्षापासून जयंती निमित्त रक्तदान शिबीर घेत आहेत हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे असे मत सुनंदाताई यांनी व्यक्त केले.
मंगेश आजबे हे गेल्या पाच वर्षापासून जिजाऊ जयंती निमित्त रक्तदान शिबीर घेतात. रक्तदान शिबीराला उत्फुर्त प्रतिसाद मिळतो या वर्षी तर राजमाता जिजाऊ जयंती निमित्त महिलांच्या हस्ते जिजाऊ माँ साहेबांना वंदन करण्यात आले आणी महिलांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केले. रक्तदान करूत जिजाऊंना वंदन करण्यात आले.
राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांच्या जयंती निमित्त शंभूराजे कुस्ती संकुल व मंगेश कन्स्ट्रक्शन चे मालक श्री मंगेश दादा आजबे यांच्याकडून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचा शुभारंभ आमदार श्री रोहित दादा पवार यांच्या मातोश्री सौ सुनंदाताई पवार व सर्व महिलांच्या हस्ते करण्यात आला. रक्तदान शिबीरात 140 रक्तदात्यांनी रक्तदान केले. गेल्या पाच वर्षापासून जिजाऊ जयंती निमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येते.
याप्रसंगी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, प्रहार संघटनेचे अध्यक्ष जयसिंग उगले मा.सभापती सूर्यकांत नाना मोरे, जामखेडचे उपनगराध्यक्ष महेश निमोणकर,चौंडीचे सरपंच सुनील उबाळे, अरणगावचे सरपंच संतोष निगुडे, झिक्रीचे सरपंच दत्तात्रय साळुंखे, सावरगावचे सरपंच काकासाहेब चव्हाण, हळगावचे सरपंच किसन ढवळे, खांडवीचे सरपंच नरेंद्र जाधव, बोर्लागावचे मा. सरपंच कृष्णाराजे चव्हाण, भीमराव डूचे, खुरदैठणचे सरपंच बाळासाहेब ठाकरे, ग्रा.स.सतीश काळे, ग्रा.स.ऋषिकेश डूचे,उमर कुरेशी, जुबेर शेख इत्यादी मान्यवर उपस्थित होते