जामखेड न्युज——
जीवनाचा यशस्वी होण्यासाठी वेळेचे नियोजन करा शिवव्याख्याते गणेश भोसले
जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी आणि मेहनत या त्रिसूत्रीचा अवलंब करावयास हवा. यशाच्या मार्गावर मार्गक्रमण करत असताना अनेक संकटे समोर उभी ठाकतात; पण या संकटांना न डगमगता आपण पुढे मार्गक्रमण करत राहिल्यास हमखास यश प्राप्त होते. यशस्वी होण्यासाठी वेळेचे योग्य नियोजन करा यश तुमच्याच हातात आहे तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार असे मत शिवचरित्रकार गणेश भोसले यांनी सांगितले.
पाटोदा तालुक्यातील श्री जगदंबा विद्या मंदिर धनगर जवळका येथे गणेश भोसले यांचे आज दि. ४ रोजी तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार या विषयावर व्याख्यान झाले यावेळी मुख्याध्यापक विकास वराट, ए. एम. पवार, काळे सर, आगे सर, वाकडे सर, के. एम पवार, वारे सर, अतुल पवार, टेकाळे सर, अनभुले सर यांच्या सह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी हजर होते.
यावेळी आपल्या ओघवत्या शैलीत व्याख्यान देताना विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले, यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील अनेक प्रसंगावर कथन केले. तसेच अनेक दाखले दिले अडचणी च्या काळात न डगमगता कसे नियोजन करावे हे सांगितले.
जीवनात यशस्वी होण्यासाठी वेळेचे नियोजन करा झपाटून कामाला लागा यशापासुन तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही असे सांगितले.
तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात असे सांगितले.