जामखेड न्युज——
रुग्णवाहिकेच्या चालकाने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून केला वाढदिवस साजरा
रुग्णवाहिकेचा चालक दादा घोडेस्वार यांनी वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना केले शालेय साहित्याचे वाटप
रुग्णवाहिकेवर कार्यरत असलेले दादा घोडेस्वार हे दरवर्षी आपला वाढदिवस वेग वेगळा सामाजिक उपक्रम राबवून साजरा करतात या वर्षी त्यांनी साकत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांना शालेय साहित्याचे( वही व पेन) वाटप करून तसेच विठ्ठल मंदिरात पंखा बसवून साजरा केला यामुळे सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकत येथे शालेय साहित्याचे वाटप करताना सरपंच हनुमंत पाटील, उपसरपंच राजाभाऊ वराट, साकत सेवा संस्थेचे माजी चेअरमन प्रा. अरुण वराट, जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, ग्रामपंचायत सदस्य महादेव वराट, सेवा संस्थेचे संचालक गणेश वराट, युवराज वराट, केशव वराट, बाळू वराट, तय्यब शेख, शिवाजी मिसाळ, संध्या खंडागळे, अर्चना भोसले, बंडू पुलवळे, योगेश घोडेस्वार यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
4 जानेवारी रोजी दादा घोडेस्वार यांचा वाढदिवस
घोडेस्वार हे एक गरीब कुटुंबातील सदस्य आहेत. इंदिरा हॉस्पिटल मध्ये काम करत असलेले हॉस्पिटलचे संचालक डॉ. सुहास सूर्यवंशी, डॉ. पल्लवी सूर्यवंशी यांचे विश्वासू आणि हॉस्पिटल मधील सर्व स्टाफ चे आवडते व विश्वासू आहेत.
घोडेस्वार हे गेली चार वर्षापासून हॉस्पिटल मध्ये काम करत आहेत. मागील कोविड महामारी मध्ये आपल्या जीवाची परवा न करता रुग्णवाहिके वर सेवा केली. साकत गावामध्ये तसेच विविध ठिकाणी Arsenic album – 30 ( अर्सेनिक ) गोळ्यांचे वाटप केले होते. यावर्षी ही जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा साकत येथे सर्व विद्यार्थ्यांना पेन व वहीचे वाटप करण्यात आले आहे.
साकत येथे विठ्ठल रुक्माई मंदिरात सिलिंग फॅन देण्यात आला आहे.