जामखेड न्युज——
आमदार प्रा. राम शिंदे यांचा वाढदिवस जिल्हा परिषद धामणगाव शाळेत चिमुकल्या समावेश साजरा.
आमदार प्रा. राम शिंदे मित्रमंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
आमदार प्रा. राम शिंदे यांचा वाढदिवस
जिल्हा परिषद धामणगाव शाळेत चिमुकल्या समावेश साजरा केला यावेळी आमदार राम शिंदे मित्रमंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामणगाव, ता. जामखेड मधील विद्यार्थ्यांसमवेत मा.आ.प्रा.श्री. राम शिंदे साहेब यांनी साजरा केला आपला वावाढदिवस
दिनांक -31/12/2022 वार-शनिवार रोजी मा.आ.प्रा.श्री. राम शिंदे यांनी वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामणगाव, ता. जामखेड या ठिकाणी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत उत्साह पूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा केला तसेच विद्यार्थ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद व उत्साह पाहून माननीय आमदार साहेब भारावून गेले.
धामणगावचे सरपंच माननीय श्री.महारुद्र महारनवर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात माननीय आमदार साहेबांनी मनोगत व्यक्त करीत असताना शाळेची वर्गखोल्यांबाबतची प्राथमिक गरज लक्षात घेऊन शाळेस 02 वर्गखोल्या तात्काळ मंजूर करण्याबाबत कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले.
साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मा.आ.प्रा.श्री. राम शिंदे साहेब मित्र मंडळ, धामणगाव यांच्यावतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय पॅड, वही, पेन, पेन्सिल, शॉपनर, खुडरबर, बिस्किट पुडे इत्यादी शालेय साहित्याचे वाटप केले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी माननीय आमदार साहेबांना वाढदिवसानिमित्त तसेच नवीन वर्षाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या.