जामखेड न्युज——
शाँटसर्किटमुळे लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान
शहरातील तपनेश्वर भागातील बाळासाहेब भानुदास भोसले यांच्या घरात शाँटसर्किटमुळे लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाच्या गाडीमुळे आग आटोक्यात आली तोपर्यंत घरातील अनेक वस्तू जळून खाक झाल्या होत्या.
बाळासाहेब भानुदास भोसले यांच्या तपनेश्वर भागातील भोसले मळा येथील घरातील कपाट, कपडे, रोख रक्कम, कुलर, खिडकी, दोन दरवाजे, सोने यासह अनेक वस्तू जळून खाक झाल्या.
शनिवार दि. ३१रोजी सायंकाळी सहा वाजता घरातील महिला मंडळ घराबाहेर भाजी निवडत असताना अचानक घरातून धुर बाहेर दिसला आसपासचे लोक जमा झाले तर घरात प्रचंड प्रमाणात आग लागली होती. ताबडतोब
अग्निशामक गाडी बोलावली आग आटोक्यात तोपर्यंत अनेक वस्तू जळून भस्मसात झाल्या होत्या.
आग विझविण्यासाठी सोनु गोरसाळी, महेंद्र आदे,
हरी जाधव राजू जाधव, दत्ता पवार, जालिंदर जाधव, शहाबाज शेख, पिंटू डुचे, खंडू कडेकर
बंगल्यावर सगळीकडे हाई लागली होती. अग्निशामक विजू पवार, अय्याज शेख हे उपस्थित होते.
रात्री उशिरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा केला आहे.