स्वराज सचिन गायवळ यांच्या वाढदिवसानिमित्त गोशाळेत चारा वाटप

0
164

जामखेड न्युज——

स्वराज सचिन गायवळ यांच्या वाढदिवसानिमित्त गोशाळेत चारा वाटप

सामाजिक कार्यकर्ते निलेश गायवळ यांचे पुतणे व प्रा. सचिन गायवळ यांचे चिरंजीव स्वराज सचिन गायवळ यांच्या वाढदिवसानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिदुस्तान संचलित श्री साकेश्वर गोशाळेतील गायींना
गायवळ मित्रमंडळाच्या वतीने हिरवा चारा वाटप करण्यात आला. सुमारे सत्तर गायींना दोन दिवस पुरेल एवढी ऊसाचे वाढे कुट्टी वाटप करण्यात आली.

यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिदुस्तानचे पांडूराजे भोसले, किशोर गायवळ, विशाल दौंड, जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, शिवाजी (नाना) खंडागळे, मयूर भोसले, तुषार बोथरा, प्रकाश मुरूमकर, आजीनाथ पुलवळे, शोभा पुलवळे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना किशोर गायवळ म्हणाले की,
सामाजिक कार्यकर्ते निलेश गायवळ यांचा पुतण्या व प्रा. सचिन गायवळ यांचे चिरंजीव स्वराज गायवळ यांच्या वाढदिवसानिमित्त गोशाळेतील गायींना हिरवा चारा वाटप करण्यात आला आहे. गायवळ कुटुंब हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. विविध सामाजिक उपक्रम राबवितात.

श्री शिवप्रतिष्ठान हिदुस्तानचे पांडुराजे भोसले म्हणाले की, आपल्या वाढदिवसानिमित्त गायींना हिरवा चारा हा उपक्रम गायवळ कुटुंबाने जपला आहे. परिसरातील तरुणांनी आपला वाढदिवस गायींना चारा देऊन साजरा करावा.

तुषार बोथरा म्हणाले की, समाजातील तरूणांनी गायवळ कुटुंबाचा आदर्श घ्यावा. वाढदिवसानिमित्त गायींना हिरवा चारा देणे हा स्तुत्य उपक्रम आहे.

गायवळ कुटुंबाने नेहमीच आपल्या कुटुंबातील सदस्यच्या वाढदिवसानिमित्त कधी गायींना पुरणपोळी तर कधी हिरवा चारा गोरगरिबांना मदत रूग्णांना मदत असे विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here