जामखेड न्युज——
भरतीसाठी विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचार करावा – पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड
आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून जामखेड मध्ये पोलीस भरती मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न
विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचार करावा अपयश लपवण्यासाठी अनेक गैरसमज पसरवले जातात, पोलीस भरती वेळी अनेकजण प्रलोभनांना बळी पडतात असे कोणीही करू नये, सर्व भरती प्रक्रिया अतिशय निपक्षपातीपणे पार पाडल्या जातात, कोणाकडूनही मार्गदर्शन घेताना कमीपणा बाळगू नये आमदार रोहित दादा पवार यांनी भरती होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली व टी-शर्ट वाटप करून प्रोत्साहन दिले हा उपक्रम अतिशय चांगला कौतुकास्पद आहे. असे मत पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी व्यक्त केले.
कर्जत जामखेडचे आमदार रोहित दादा पवार यांच्या संकल्पनेतून आणि कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था यांच्या माध्यमातून जामखेड मध्ये भव्य पोलीस भरती मार्गदर्शन कार्यशाळा शिवनेरी अकॅडमी मध्ये संपन्न झाली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड प्रमुख उपस्थिती कर्जत जामखेड विधानसभा अध्यक्ष मधुकर राळेभात , स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शक फुलचंद बारस्कर व हर्षद वारे, शिवनेरीचे संचालक कॅप्टन लक्ष्मण भोरे, एनसीसी ऑफिसर मयूर भोसले, त्रिदल संघटनेचे उपाध्यक्ष कांतीलाल कवादे, सचिव शहाजी ढेपे, विठ्ठल लेकुरवाळे, शिवाजी चव्हाण, अशोक चव्हाण, प्रमोद टेकाळे ,राजकुमार बराटे ,बबन नाईक अंजुम शेख, फ्युचर अकॅडमीचे प्रवीण वाघमारे नगरसेवक दिगंबर चव्हाण नामदेव राळेभात, प्रवीण उगले, विजय नागरगोजे कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेचे समन्वयक व तालुक्यातील सर्व पोलीस भरती करणारे प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शक फुलचंद बारस्कर यांनी लेखी परीक्षा शारीरिक चाचणी याविषयी सखोल मार्गदर्शन करून शेवटच्या काळामध्ये कोणीही जखमी होऊ नये शरीराचे काळजी व्यवस्थित घेणे तसेच प्रश्नपत्रिका स्वरूप समजावून घेणे व आपल्या आई-वडिलांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात तसेच परीक्षा काळात वेळेचे नियोजन अतिशय चांगल्या प्रकारे कसे करायचे याचे मार्गदर्शन केले.
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक हर्षद वारे सर यांनी विद्यार्थ्यांनी नेहमी सकारात्मक विचार ठेवावा तुम्ही नक्की यशस्वी व्हाल अभ्यास एकाग्रचित्ताने करावे आपली स्वतःची मनस्थिती बदलली तर आपली परिस्थिती बदलतेच व पोलीस भरती लेखी परीक्षेत विविध विषयांबद्दल सखोल मार्गदर्शन केले. व आमदार रोहित दादा यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल व विद्यार्थ्यांच्या हिताचे उपक्रम घेतात त्या बद्दल आभार मानले.
प्रा. मधुकर राळेभात त्यांनी मार्गदर्शन करताना शारीरिक व मानसिक सुदृढ ठेवावी तसेच आहार शास्त्र विषयी माहिती दिली व आपण नेहमी सकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तींच्या सहवासात राहावे आपल्याच सकारात्मक बदल होतात व पोलीस भरती परीक्षेत पात्र विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनसीसी ऑफिसर मयूर भोसले तर आभार प्रदर्शन कॅप्टन लक्ष्मण भोरे यांनी केले.