जामखेड न्युज—-
सलीम बागवान यांची हाज कमिटी संचालक पदी नेमणूक
जामखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा
महाराष्ट्र अल्पसंख्याक मंत्रालय- महाराष्ट्र राज्य हाज कमिटी संचालकपदी भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचेे प्रदेश उपाध्यक्ष सलीम बागवान यांची नेमणूक करण्यात आली आहे यामुळे जामखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शिन्दे- फडणवीस सरकारसत्तेवर आल्यावर हिवाळी अधिवेशन च्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र राज्य हाज कमिटी ची घोषणा केली मुस्लिम समाजाच्या पवित्र अश्शा समजल्या जाणाऱ्या हाज कमिटीची स्थापना करून शिन्दे -फडणविस सरकार ने मुस्लिम समाजाला एक चांगला संदेश दिला आहे.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या आदेशाने करण्यात आली निवड करण्यात आली आहे.
निवड झाल्यानंतर संघटन मंत्री आमदार श्रीकांत भारती जी, महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार रामजी शिंदे, खासदार सुजयजी विखे पाटील, पाथर्डी शेवगावचे आमदार मोनिकाताई राजळे, भाजपा कार्यालय अध्यक्ष रवी जी अनासपुरे, प्रदेश सचिव हाजी हैदर आजम जी, प्रदेश सचीव ईद्रीश मुलतानी जी, प्रदेश कार्यकारणी सदस्य भानुदास जी बेरड यांच्या सह अनेकांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या आहेत.