जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
तालुक्यातील राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या साकत ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा पदभार स्वीकारताच मनिषा पाटील यांनी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मास्क, व्हिटॅमिन (सी) च्या गोळ्या, पॅराशिटीमल व इतर औषधे आरोग्य विभागाकडे दिले व गावात विलगीकरण कक्षात असलेल्या रूग्णांना देण्यात यावेत असे सांगितले तसेच आशा सेविकांना मानधन देण्यात आले गावातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आठ दिवस अॅटिजेन तपासणी कॅम्प ठेवण्यात आला आहे त्यात संशयित लोकांनी तपासणी करून घ्यावी असे सरपंच मनिषा पाटील यांनी सांगितले.

आज साकत ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा पदभार मनिषा पाटील यांनी स्विकारला यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य डॉ भगवानराव मुरुमकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते व माजी सरपंच हनुमंत पाटील, उपसरपंच बळीराम कोल्हे, सदस्य सागर मुरूमकर, मिलन घोडेस्वार, राजेंद्र कोल्हे, जिजाबाई कोल्हे, सिंधुबाई नेमाने, संजय वराट, राजू वराट, रूपाली वराट, रंजना वराट, रतनबाई वराट, चंद्रभागा नेमाने, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र वळेकर, पोलीस पाटील महादेव वराट, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत पाखरे, डॉ. मुबारक शेख, सतिश लहाने, पांडुरंग लोहार, प्रभु पुलवळे, आशा सेविका मनिषा महादेव वराट, छाया चंद्रकांत वराट, मनिषा पांडुरंग सानप, लता दत्तात्रय नेमाने, स्वाती बाजीराव कोल्हे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सरपंच पदाचा पदभार स्वीकारताच मनिषा पाटील यांनी प्रत्येक नागरिकाने मास्क वापरावे म्हणून आरोग्य विभाग व आशा सेविकांकडे मास्क दिले व ज्या लोकांना मास्क नाही अशा लोकांना मास्क द्यावे असे सांगितले तसेच बाहेर गावाहून आलेले व आरटीपीसीआर रिपोर्ट येईपर्यंत विलगीकरण कक्षात असलेल्या लोकांना पॅराशिटीमल व्हिटॅमिन सी तसेच इतर औषधे देण्यात आली ते गरजू लोकांना द्यावेत असे सांगितले यावेळी त्यांनी आशा सेविकांना मानधनही दिले हे सर्व सरपंच पाटील यांनी पदरमोड करून दिले.
यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ प्रशांत पाखरे यांनी सांगितले की, गावात आठ दिवसांत साठ पेशन्ट निघाले आहेत हि साखळी तोडण्यासाठी एखाद्या घरातील एखादा व्यक्ती पाॅझिटिव्ह निघाला तर घरातील सर्व व संपर्कातील सर्व व्यक्तीनी अॅटिजेन तपासणी करून घ्यावी व प्रत्येकाने मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे प्रत्येकाने योग्य काळजी घेतली तर आपण निश्चितच कोरोना महामारी वर विजय मिळवू शकतो.
यावेळी कोरोना साखळी तोडण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येतील असे सरपंच पाटील यांनी सांगितले व सर्व सदस्यांनी यास एकमुखी पाठिंबा दिला.