जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक शेखलाल हुसेन शेख यांचे वृद्धापकाळाने निधन

0
209
जामखेड प्रतिनिधी 
              जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
जामखेड तालूक्याचे भुषण तथा जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक हाजी शेख शेखलाल हुसेन यांचे दि. १७ रोजी वृद्धापकाळाने दुखद निधन झाले आहे. मृत्यूसमयी त्यांचे वय १०३ वर्षे होते. त्यांचा स्वातंत्र्यपूर्व काळात देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक संग्रामात सक्रिय सहभाग होता. अनेक वेळा तुरूंगात जाऊन आले. शेखलालभाई तालुक्यातील दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे संचालक होते.  स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिनाच्या झेंडावंदनाला तहहयात त्यांची हजेरी चुकली नाही.  त्यांच्या निधनाची बातमी कळताच अनेक राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक क्षेत्रातील लोकांनी श्रद्धांजली वाहिली.  त्यांच्या पश्चात तीन मुलगे दोन मुली सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here