जामखेड न्युज——
तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत अहिल्यादेवीनगर शाळेने पटकावला प्रथम क्रमांक
“पैशापेक्षा संस्कार मोठे असतात” नाटकाचे सादरीकरण
२६ डिसेंबर रोजी ल.ना. होशिंग विद्यालयात झालेल्या तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिल्यादेवीनगर शाळेने “पैशापेक्षा संस्कार मोठे असतात” या विषयावर आधारित नाटक व चंद्रा गाण्यावर मनमोहक नृत्य सादर करून तालुक्यात लहान गटात प्रथम क्रमांक मिळविला यामुळे या चिमुकल्यावर व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या नृत्यात संचिती घायतडक, प्रणिती घायतडक, गौरी भवर, शिफा शेख, प्रथमेश म्हेत्रे, धीरज काशीद, शुभम म्हेत्रे, धनंजय घायतडक, जास्मिन पठाण श्रेयश बोराटे यांनी सहभाग घेतला होता
त्यांना श्रीमती वाघ मनीषा व बहिर नवनाथ तसेच सर्व पालक यांनी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे, पाटोदा केंद्राचे केंद्रप्रमुख राऊत संतोष तसेच पालक व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे. तसेच शाळेत येऊन मार्गदर्शन केले व कौतुक केले.