जामखेड न्युज——
अवैध खाण प्रकरणी प्रांताधिकारी व तहसीलदार निलंबित
कर्जत जामखेड तालुक्यात एकच खळबळ
कर्जत जि. अहमदनगर अनधिकृत खाण आणि स्टोनक्रेशर प्रकरणी कर्जतचे प्रांताधिकारी व
तहसीलदार निलंबित केले असुन, विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती एक महिन्यात अहवाल सादर करणार.
अवैध खाण प्रकरणी कामात हलगर्जीपणा तसेच कुचराई केल्याप्रकरणी प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले व तहसीलदार नानासाहेब आगळे यांना आज नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात निलंबित करण्यात आले. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी आदेश काढला आहे.
निलंबनाच्या कारवाई मुळे कर्जत-जामखेड परिसरात एकच खळबळ उडाली आहे.