जामखेड न्युज——
जिरवाजिरवीचे नाही.तर आपल्याला विकासाचे राजकारण करायचे आहे – आमदार प्रा राम शिंदे

आपल्या माणसाकडे हक्काने जाता येते अडीअडचणी सांगता येतात बाहेरचा माणूस आपले ऐकूनही घेत नाही हे
लोकांनी गेल्या अडीच तीन वर्षात अनूभवल आहे, आपला आणि बाहेचा काय असतो ते.असे सांगत आमदार प्रा राम शिंदे यांनी जिरवाजिरवीचे नाही.तर आपल्याला विकासाचे राजकारण करायचे असल्याचे सांगितले.

तालुक्यातील चोंडी येथे आ शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी जामखेडसह कर्जत तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार केला. यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपाचे विधानसभा प्रमुख रवी सुरवसे, जेष्ठ कार्यकर्ते काकासाहेब धांडे, जिल्हा परिषद सदस्य अशोक खेडकर, सोमनाथ पाचारणे, भाजपा जामखेड तालुकाध्यक्ष अजय काशीद,कर्जतचे तालुकाध्यक्ष डाॅ.सुनील गावडे, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे कर्जत तालुकाप्रमुख बळीराम यादव, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले, माजी सभापती बाप्पु शेळके, पांडुरंग उबाळे, नगरसेवक अमित चिंतामणी, मंगेश पाटील, सचिन पोटरे , गोरख घनवट, प्रवीण चोरडीया , ॲड.प्रवीण सानप, दादासाहेब वारे, वैजीनाथ पाटील यांच्यासह मोठया संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी आ. शिंदे म्हणाले, अधिवेशनाच्या निमित्ताने नागपुरला असताना माझ्यासह सर्वच आमदारांना आपल्या मतदारसंघातील ग्रामपंचायत निकालाबाबत उत्कंठा होती. कर्जत जामखेड तालुक्यातील अकरा पैकी आठ ग्रामपंचायतीत भाजपा आणि मित्र पक्षाला लोकांनी बहुमताने संधी दिल्याने लोकांचा कौल स्पष्ट झाला आहे.असे सांगत आ शिंदे म्हणाले कर्जत तालुक्यातील निंबे ग्रामपंचायतीचे सरपंचपद केवळ पाच मतांनी विरोधकांच्या ताब्यात गेलेले आहे.मात्र तेथेही पाच ग्रामपंचायत सदस्य भाजपाचे असल्याने आपले बहुमत आहे.
यावेळी आमदार शिंदे यांनी नवनिर्वाचित सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना शुभेच्छा देत,गावच्या विकास कामांसाठी खंबीरपणे पाठीशी राहणार असल्याचे सांगितले.
चौकट –
आ प्रा राम शिंदे यांनी ठेवलेल्या सत्कार कार्यक्रमास मतदारसंघातील नवनिर्वाचित सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांचा फेटा बांधून आ शिंदे यांनी सन्मान केला.




