जामखेड न्युज——
हरीने वाचवला हरणाचा जीव
हरी व मित्रांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून हरणाला विहिरीतून सुरक्षित बाहेर काढून सोडले जंगलात
ज्वारी पिकाला पाणी देण्यासाठी हरीभाऊ नरहरी वराट हे साकत परिसरातील सालई भागात ज्वारी पिकाला पाणी देत असताना शेजारी विठ्ठल मारूती पुलवळे यांची विहीरीत किती पाणी हे पाणी पाहण्यासाठी गेले असता विहिरीत कमी पाणी होते. पण विहिरीत पाणी कमी होते पण एक हरणाचे पाडस विहिरीत दिसले. विहिरीत उतरणे खुपच अवघड होते. तेव्हा मित्रांना बोलावून सोल (दावे) आणुन सुरक्षित बाहेर काढले व निसर्गात सोडून दिले.
हरीभाऊ नरहरी वराट यांनी विहिरीत पडलेल्या पाडसाला बाहेर काढण्यासाठी कल्याण देवराव घोडेस्वार व राजेंद्र महादेव घोडेस्वार यांना फोन करून बोलवले तसेच विहिरीत उतरण्यासाठी सोल दावे आणण्यासाठी सांगितले दाव्यांचा साहाय्याने विहिरीत उतरूण हरणाला सुरक्षित बाहेर काढले.
विहिरीत उतरणे खुपच धोकादायक होते तेव्हा हरीभाऊ ने दोघा सहकार्याना बोलावून रस्सीच्या साहाय्याने विहिरीत उतरून हरणाला सुरक्षित पणे बाहेर काढून जंगलात सोडले यामुळे हरणाला जीवदान मिळाले आहे. यामुळे त्याचे कौतुक होत आहे.