जामखेड न्युज——
अकरा पैकी सात ग्रामपंचायत वर भाजपाचा झेंडा
९५ ग्रामपंचायत सदस्यांपैकी ५५ सदस्य भाजपाचे
आमदार प्रा. राम शिंदे यांचा करिश्मा तर आमदार रोहित पवारांना आत्मपरिक्षणाची गरज
कर्जत-जामखेड मतदारसंघात आमदार राम शिंदेंचाच बोलबाला
11 पैकी 7 ग्रामपंचायतीवर भाजपने फडकावला झेंडा
11 ग्रामपंचायतमध्ये भाजपचे सर्वाधिक 51 सदस्य निवडून आले
कर्जत-जामखेड मतदारसंघातील 11 ग्रामपंचायतींचे मंगळवारी निकाल लागले. या निकालात 11 पैकी 7 ग्रामपंचायतींवर भाजपने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत आमदार रोहित पवार यांना जोर का झटका दिला. आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा कर्जत- जामखेड मतदारसंघातील जनतेने विश्वास दाखवला आहे. अगामी बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निकाल भाजपला पोषक वातावरण तयार करणारा ठरला आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघातील 11 ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक पार पडली. यामध्ये कर्जत तालुक्यातील 8 तर जामखेड तालुक्यातील 3 ग्रामपंचायतींचा समावेश होता. कर्जत – जामखेड मतदारसंघात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुका अगामी बाजार समिती निवडणुकांची लिटमस चाचणी होती, यात पवार बाजी मारणार की शिंदे यावर पुढील रणनिती ठरणार असेच बोलले जात होते, अखेर निकाल समोर आले, यात आमदार राम शिंदे यांनी बाजी मारली.
कर्जत-जामखेड मतदारसंघात आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने 11 पैकी 7 गावांवर कब्जा मिळवला. त्यामुळे अगामी बाजार समिती निवडणुकीत भाजपसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. यामुळे भाजपा आणि मित्रपक्षांचा उत्साह अधिकच दुणावला आहे. राष्ट्रवादीला या निवडणुकीत मिळालेले तुटपुंजे यश आमदार रोहित पवारांना धक्का देणारे ठरले आहे. आमदार राम शिंदे यांची लोकप्रियता अधिक वाढू लागल्याचे या निकालातून स्पष्ट होत आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघातील राजुरी, रत्नापुर, शिऊर, अळसुंदे, कापरेवाडी, निंबे, कोपर्डी, म्हाळंगी, मुळेवाडी, बहिरोबावाडी, कौडाणे या 11 ग्रामपंचायतींचे निकाल मंगळवारी हाती आले. यामध्ये शिऊर, अळसुंदे, कापरेवाडी, म्हाळंगी, मुळेवाडी, कौडाणे, 6 ठिकाणी भाजपाचे सरपंच पदाचे उमेदवार निवडून आले, बहिरोबावाडीत भाजपामित्रपक्षाचा सरपंच झाला तर कोपर्डीत अपक्ष सरपंच झाला. राजुरी आणि निंबे गावात सरपंच राष्ट्रवादीचा झाला, बहुमत भाजपाचे झाले राष्ट्रवादीचे रत्नापुर, राजुरी आणि निंबे या तीन गावांत सरपंच झाले. रत्नापुरात राष्ट्रवादीला काठावरचे बहुमत आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघातील 11 ग्रामपंचायतींमध्ये निवडून आलेल्या सदस्यांमध्ये भाजपचाच बोलबाला आहे. मतदारसंघातील 11 ग्रामपंचायतींमध्ये एकुण 95 ग्रामपंचायत सदस्य निवडले जाणार होते. यामध्ये भाजपचे सर्वाधिक 51 सदस्य निवडून आले, तर राष्ट्रवादीचे अवघे 20 सदस्य निवडून आले. तसेच 21 ठिकाणी स्थानिक विकास आघाडी आणि अपक्षांचे एकुण 21 सदस्य निवडून आले. अवघ्या 3 जागांवर काँग्रेसचे सदस्य निवडून आले.
चौकट
आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली रत्नापुर, राजुरी आणि निंबे या तीन गावांत राष्ट्रवादीचे सरपंच झाले. परंतू निंबे आणि राजुरीत भाजपाचे बहुमत आहे. एकुणच संपुर्ण मतदारसंघात राष्ट्रवादीला बहुमत असलेली रत्नापुर ग्रामपंचायत जिंकता आली. तेथेही राष्ट्रवादीला काठावरचे बहुमत आहे. एकुणच ग्रामपंचायत निकालातून जनतेने आमदार रोहित पवारांना नाकारल्याचे दिसत आहे.
चौकट
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब साळुंके यांच्या आळसुंदे गावात भाजपने जोरदार मुसंडी मारत ग्रामपंचायतवर कब्जा मिळवला. याठिकाणी भाजपचे 11 पैकी 8 सदस्य विजयी ठरले. विशेष म्हणजे सरपंचपदाचे उमेदवार स्मिता जिजाबाई अनारसे ह्या मतदारसंघात सर्वाधिक 435 मतांनी विजयी झाल्या. आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वावर येथील जनतेने विश्वास दाखवला. काँग्रेसचा या ठिकाणी मानहानिकारक पराभव झाला.