जामखेड न्युज——
शिऊर ग्रामपंचायत वर गेल्या चार दशकापासून उतेकर कुटुंबियांचे वर्चस्व
गिरीजा गौतम उतेकर यांची भरघोस मतांनी शिऊर ग्रामपंचायतच्या सरपंच पदी निवड
छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौतम उतेकर यांनी गेल्या चार दशकापासून शिऊर ग्रामपंचायत वर आपले वर्चस्व राखले आहे. त्यांच्या पत्नी गिरीजा गौतम उतेकर यांची भरघोस मतांनी शिऊर ग्रामपंचायतच्या सरपंच पदी निवडून आल्या आहेत. यामुळे भाजपाने या ग्रामपंचायत वर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
जामखेड न्युजशी बोलताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौतम उतेकर म्हणाले की, १९८२ सालापासून आमच्याच गटाचा सरपंच शिऊर ग्रामपंचायत मध्ये आहे. आता आठ पंचवार्षिक निवडणुका झालेल्या आहेत.
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत हनुमंत उतेकर हे जनतेतून सरपंच पदी निवडून आले होते. यानंतर या पंचवार्षिक निवडणुकीत गौतम उतेकर यांच्या पत्नी गिरीजा उतेकर या सरपंच पदी भरघोस मतांनी निवडून आल्या आहेत. यामुळे गेल्या चार दशकापासून उतेकर कुटुंबियांचे शिऊर ग्रामपंचायत वर वर्चस्व दिसून येत आहे.
शिऊर ग्रामपंचायत मध्ये गेल्या चार दशकापासून उतेकर कुटुंबियांचे वर्चस्व आहे. आणि सलग दुसऱ्यांदा जनतेतून सरपंच पदाचा मान उतेकर घराण्यात आला आहे.
सरपंच पदी गिरीजा गौतम उतेकर सर्वसाधारण स्त्री
प्रभाग क्रमांक १
नरेंद्र आण्णा पाचारे अनुसूचित जाती,
आजीनाथ बंन्सी निकम -सर्वसाधारण,
प्रियांका भाऊसाहेब तनपुरे सर्वसाधारण स्त्री
प्रभाग क्रमांक २
सेवक शहाजी फाळके – ना. मा. प्र. व्यक्ती,
शोभा बापूराव पिंपरे – सर्वसाधारण स्त्री,
शितल अशोक इंगळे – सर्वसाधारण स्त्री,
प्रभाग क्रमांक ३
बदाम बाबासाहेब निंबाळकर – सर्वसाधारण,
उषा नारायण निकम सर्वसाधारण स्त्री,
राजश्री दादा लटके सर्वसाधारण स्त्री