जामखेड न्युज——
जिल्हा परिषद लोणी शाळेस मिशन आपुलकी अंतर्गत ग्रामस्थांची सव्वा लाखाची मदत
सोमनाथ लंगडे पाटील यांनी दिले शाळेस इनव्हर्टर भेट
मिशन आपुलकी अंतर्गत ग्रामस्थांची जि. प . लोणी शाळेच्या विकासाला चालना – मा . कैलासराव खैरे साहेब गट शिक्षणाधिकारी जामखेड
ग्रामिण भागातील विदयार्थांची शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी ग्रामस्थांना आव्हान करताच मुंबईला रहिवाशी असणारे लोणी गावचे सुपुत्र उदयोजक मा . सोमनाथ लंगडे पाटील यांनी शाळेस विद्युत पुरवठा अखंडितपणे राहण्यासाठी २१०००/- रु. किंमतीचे इनव्हर्टर भेट म्हणून दान केले . या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी जामखेड तालुक्याचे कर्तव्यदक्ष, मनमिळावू गट शिक्षणाधिकारी मा . कैलासराव खैरे साहेब उपस्थित होते .
त्यावेळी बोलतान श्री सोमनाथ लंगडे म्हणाले की , मी ज्या लोणी शाळेत संस्काराचे धडे घेतले त्या शाळेप्रती मला सदैव प्रेम आणि अभिमान वाटतो . शाळेच्या विकासासाठी सर्व माजी विद्यार्थी, प्रतिष्ठित व्यक्ती व शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून आपल्या गावातील विदयार्थी विविध क्षेत्रात उच्च पदावर कसे पोहचतील यासाठी आपण सतत प्रयत्न करूया तसेच मा . श्री . खैरे साहेब म्हणाले , सध्याच्या डिजिटल युगात संगणकाचा वापर करता यावा म्हणून श्री.लंगडे साहेबांनी शाळेस इनव्हर्टर बक्षिस दिले ही बाब स्तूत्य व विदयार्थ्याच्या गुणवत्ता वाढीस पुरक आहे , तसेच पुढच्या पिढीला वारसा अवगत व्हावा म्हणून श्री लंगडे साहेबांचे चिरंजीव व सुन , पत्नी यांच्या समवेत आले . त्यामुळे खैरे साहेबांनी त्यांचे धन्यवाद मानले . तसेच श्री.कांतीलाल गायकवाड यांनी स्वातंत्र्यदिनी शाळेस २१००० /- रू किंमतीचे संच दिल्याबद्दल त्यांचेही आभार मानले तसेच श्री दादाहरी गंगावणे यांनी मुलांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे म्हणून शाळेस २५००० रू किंमतीचे वॉटर प्युरीफायर अॅक्वा दिल्याबद्दल त्यांचेही स्वागत केले . श्री गणेश बामदळे यांनी ही यापूर्वी ४१००० रु किंमतीचे स्टेज स्वतः बांधून दिले. त्यामुळे मुलांच्या कलागुणांना वाव मिळत आहे. त्याचप्रमाणे माजी सरपंच श्री सिद्धेश्वर शेंडकर यांनी ग्रां पं निधीतून पाण्याची पाईपलाईन , तारेचे कंपाऊंड पूर्ण करून दिले . तसेच विदयमान सरपंच श्री. रघुनाथ परकड यांनी पाण्याची टाकी ग्रा.पं. निधीतून बांधून दिली . या सर्व दानशूरांचे दातृत्व पाहून गावचे उपसरपंच मा . संजय गव्हाळे यांनीही शाळेला दर्शनी बाजूने संपूर्ण कलरींग काम करून देण्याचे आश्वासन या प्रसंगी दिले . मा . खैरे साहेबांनी त्यांचेही अभिनंदन केले . तसेच शालेय व्य . समितीचे होतकरू अध्यक्ष श्री .आसलम शेख यांच्या पुढाकाराने पालकवर्गणी करून शाळेसाठी १८०००/रू किंमतीचे झेरॉक्स मशिन मिळवून दिले.त्यामुळे गुणवत्ता वाढीसाठी साप्ताहिक चाचण्यांचे नियोजन करता आले .
त्यामुळे इ .५वी शिष्यवृत्ती परिक्षेस सहा विदयार्थी पात्र झाले. या कामी वर्गशिक्षिका श्रीम . सुरेखा बांदल,श्रीम . सुनंदा बांगर, श्री सुनिल कुमटकर यांनी मार्गदर्शन केले .
शाळेचे मुख्याध्यापक श्री . दत्तात्रय यादव , पदवीधर शिक्षक श्री. नितीन बोराटे यांनीही लोकवर्गणी व लोकसहभाग वाढवण्यासाठी परिश्रम घेतले .
मिशन आपूलकी अंतर्गत जामखेड तालुक्याचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी मा . प्रकाशजी पोळ साहेब , खर्डा बीट विस्ताराधिकारी श्री.सुरेश कुंभार साहेब, नायगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री . किसनराव वराट साहेब या सर्व अधिकारी वर्गाचे सातत्याने मार्गदर्शन लाभल्यामुळे आम्हा सर्व शिक्षकांना प्रेरणा मिळाली.
इनव्हर्टर उद्घाटन प्रसंगी सौ . सुरेखा सोमनाथ लंगडे , महेश लंगडे , सौ .पूजा लंगडे , श्री . राम लंगडे , माजी सरपंच सिद़धेश्वर शेंडकर, Smc अध्यक्ष आसलम शेख , दानशुर दाते श्री . दादाहरी गंगावणे मेजर , सुजित पवार, बबन भाई शेख ( दुकानदार ) श्री . रघुनाथ परकड ( चेअरमन ) smc सदस्य ईश्वर पवार , पोपट बामदळे , अशोक गंगावणे , पैलवान बबलू घुमरे, अक्षय सुतार , माणिक आव्हाड ,व छगन पवार ( ग्रा.प. सदस्य ) आदी उपस्थित होते .