जामखेड न्युज——
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनद्वारे घेतला कर्जत बाजार समितीचा आढावा
निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या कार्यकर्त्यालाच कर्जत बाजार समितीच्या निवडणुकीत उमेदवारी – आमदार प्रा राम शिंदे
रेहकुरी येथे पार पडली भाजपाची बैठक : बाजार समिती ताब्यात ठेवण्याचा भाजपा कार्यकर्त्यांचा निर्धार
आमदार प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने कर्जत बाजार समितीच्या निवडणूकीची तयारी हाती घेतली आहे. गुरूवारी रात्री कर्जत तालुक्यातील रेहकुरी येथील विश्रामगृहावर भाजपाच्या कार्यकर्त्यांची आमदार राम शिंदे यांनी बैठक घेतली. बाजार समितीवर भाजपची सत्ता पुन्हा आणायची, असा निर्धार सर्वच कार्यकर्त्यांनी बैठकीत बोलून दाखवला.
बैठकीला मार्गदर्शन करताना आमदार राम शिंदे म्हणाले की, राज्यात आणि केंद्रात आपली सत्ता आहे, मी पण आमदार झालोय, आता काय अडचण राहिली नाही, आत्ता फक्त तुम्हाला जिंकून यायचयं, त्यासाठी जे आपल्याकडं पाहिजे होतं ते आलयं, त्यामुळे आता कसली अडचण येणार नाही, मागील वेळी मार्केट कमिटी बिनविरोध करायचं ठरलं, त्यादृष्टीने सर्व जण बसले, पण निवडणूक बिनविरोध निघाली नाही, निवडणूक झाली आणि आपलीच सत्ता आली. पण आता यावेळेच्या निवडणूकीची रणनिती एकदम वेगळी असणार आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांनी सतर्क राहून, जोमाने काम करावे, असे शिंदे म्हणाले.
शिंदे पुढे म्हणाले की, कर्जत बाजार समितीच्या निवडणूकीत आपल्या पॅनलकडून उमेदवारी मिळावी यासाठी मागणी जास्त असणार आहे,पण उमेदवारी देताना कुठल्याही नेत्याचा वशिला चालणार नाही, मतदाराला काय वाटतं याच्यावरच आपल्याला उमेदवार ठरवावे लागणार आहेत, निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या कार्यकर्त्यालाच उमेदवारी दिली जाईल,बाजार समितीत आपलीच सत्ता येणार आहे. पण गाफील राहून चालणार नाही, आजच्या बैठकीला उपस्थित असलेल्या प्रत्येकाने सोसायटी आणि ग्रामपंचायतचे पाच – पाच मते जरी आणली, तरी आपण बाजी मारू, असे सांगत सर्व कार्यकर्त्यांनी झपाटून कामाला लागावे, असे अवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य अशोक खेडकर, तालुकाध्यक्ष डाॅ सुनिल गावडे, अल्लाउद्दीन काझी, प्रकाश शिंदे, सचिन पोटरे, पप्पूशेठ धोदाड, बाळासाहेब शिंदे, माणिक जायभाय, तात्या खेडकर, बापूराव शेळके,प्रकाश शिंदे, मंगेश दादा जगताप, दादा सोनमाळी,सुनील काळे, पांडुरंग भंडारी, अजित अनारसे,हनुमंत नवसरे, संतोष निंबाळकर, राहुल गांगर्डे ,शिवाजी वायसे, संभाजी बोरूडे, बाप्पुसाहेब नेटके मेजर, अनिल गदादे, संपत बावडकर, उदयसिंग परदेशी, काका धांडे, माणिक आप्पा जायभाय, संतोष निंबाळकर, शेखर खरमरे, सह आदी पदाधिकारी उपस्थित होते.
*चौकट*
कर्जत बाजार समिती निवडणुक नियोजन बैठक चालू असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आमदार राम शिंदे यांना फोन आला. यावेळी फडणवीस यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना फोनवरून मार्गदर्शन केले.कर्जत बाजार समितीवर भाजपचा झेंडा फडकावण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे अवाहन देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.