जामखेड न्युज——
स्व.गोपीनाथ मुंढे हे जनसामान्यांचे नेते – आमदार प्रा. राम शिंदे..
आमदार रोहीत पवारांचा येणाऱ्या निवडणुकीत पराभव करून – बारामतीला जावून सत्कार घेणार
स्वर्गीय गोपीनाथ मुंढे हे जनसामान्यांचे नेते होते त्यांनी त्यांच्या जीवनात केलेले काम व विचार त्यांच्या जयंती दिनी त्यांना अभिवादन करून पुढे न्यायचे आहे असे उद्गार माजी मंत्री व आमदार राम शिंदे यांनी व्यक्त केले तसेच येणाऱ्या निवडणुकीत आमदार रोहित पवार यांचा पराभव करून सत्कार घ्यायला बारामतीला जायचं असल्याचे त्यांनी सांगितले. ते खर्डा येथे भगवान बाबा प्रतिष्ठान आयोजित स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी भारतीय भाजपाचे तालुकाध्यक्ष अजय काशिद,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवि सुरवसे, मा. जिल्हा परिषद सदस्य कांतीलाल खिवांसरा, युवा नेते बाजीराव गोपाळघरे,माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, मनोज कुलकर्णी, नाना गोपाळघरे, नामदेव गोपाळघरे, वैजीनाथ पाटील, संतोष गोपाळघरे, डॉ.जयराम खोत इत्यादी उपस्थित होते.
ते बोलताना पुढे म्हणाले की स्वर्गीय मुंडे साहेब यांनी ग्रामीण भागात भाजपा वाढविण्याची मोठे काम केले आहे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे काम त्यांनी मोठ्या प्रमाणात केले त्यामुळे त्यांना लोकनेते म्हणून ओळखले जात होते. मी ग्रामपंचायतच्या निवडणुकीत पराभूत होऊन सुद्धा मला मुंडे साहेबांनी विधानसभेला उमेदवारी दिली होती त्यांच्यामुळेच मी आमदार मंत्री झालो असून मी त्यांचा चेला असल्याचा मला अभिमान आहे. गेला विधानसभेला आपल्याला वाटलं आता मोठा विकास होईल परंतु जनतेच्या अपेक्षा भंग झाल्या आहेत,तुम्ही बाहेरचे पार्सल रोहित पवारांना निवडून दिलं तुम्ही माझा पराभव केला परंतु तुम्ही माझी व तुमची पण जिरवली आहे आता मतदारसंघात दडशाहीचे राजकारण सुरू आहे.
गेल्या अडीच वर्षात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मानसन्मान आमदार पवारांनी दिला नाही, सरकार भाजपचे आले आहे आता प्रत्येक कार्यकर्त्याला ते फोन करून कार्यक्रमाला आवर्जून येण्याचे आवाहन करीत आहेत. परंतु पुढील आमदारकीच्या निवडणुकीला मी सज्ज आहे आमदार रोहित पवारांचा पराभव करून मी मागील पराभवाच्या वेळेस केलेला सत्कार पुन्हा बारामतीला जाऊन जनतेच्या आशीर्वादाने घेणार असल्याचे आमदार शिंदे यांनी ठणकावून सांगितले.
स्वर्गीय गोपीनाथ मुंढे यांच्या जयंतीनिमित्त भगवान बाबा प्रतिष्ठान तर्फे स्वर्गीय मुंढे यांच्या प्रतिमेची भव्य रथातून मिरवणूक काढण्यात आली खर्डा परिसरातील अनेकांनी विविध स्पर्धा परीक्षेत यश संपादन करणाऱ्या युवकांचा सत्कार करण्यात आला तसेच प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप आमदार शिंदे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य शरद कार्ले,भगवान बाबा प्रतिष्ठान अध्यक्ष मा. हरिभाऊ गोपाळघरे, मा.उपसरपंच भागवत सुरवसे, ग्रामपंचायत सदस्य मदन पाटील, राजू मोरे, गणेश शिंदे, प्रशांत कांबळे, कांतीलाल डोके, अँड सुभाष जायभाय,वैजीनाथ दराडे, महारुद्र महारणवर, एकनाथ गोपाळघरे, भास्कर गोपाळघरे, आण्णा खाडे, दादा चौधार, अनिल दराडे, बाबु केकाण, उमेश जायभाय, राजु जाधवर, बाबु जायभाय, सुनील केकाण मच्छिंद्र गिते, संचालक काकासाहेब गर्जे आण्णा वायसे, भारत होडशिळ, टिल्लू पंजाबी, डॉ. अल्ताफ शेख,राजेंद्र गोलेकर,नंदकुमार गोलेकर इत्यादी सह स्व.गोपीनाथ मुंढे भक्तगण भाजपचे कार्यकर्ते व ग्रामस्थ प्रचंड संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोपान गोपाळघरे व आभार बाळु गोपाळघरे यांनी मानले.
चौकट
“गेल्या अडीच वर्षात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मान सन्मान आमदार पवारांनी दिला नाही, सरकार भाजपचे आले आहे आता प्रत्येक कार्यकर्त्याला ते फोन करून कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन करीत आहेत.
प्रा.राम शिंदे
विधान परिषद सदस्य