रत्नदीप मेडिकल फौंडेशन अँड रिसर्च सेंटर तर्फे शंभर बेडेड कोवीड हॉस्पिटल सेवा सुरू करणार

0
233
जामखेड प्रतिनिधी 
            जामखेड न्युज – – ( सुदाम वराट ) 
    कोरोना महामारीचा मुकाबला करण्यासाठी  रत्नदीप मेडिकल फौंडेशन अँड रिसर्च सेंटर रत्नापूर या संस्थेमार्फत संस्थेच्या नर्सिंग, फार्मसी व होमिओपॅथीक महाविद्यालयाच्या शैक्षणिक संकुलात शंभर बेडेड कोवीड हॉस्पिटल लवकरच सुरू होत असून यामध्ये ५० आँक्सीजन बेड व चार व्हेंटीलेटर साठी युध्द पातळीवर प्रयत्न चालू असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ.भास्कर मोरे पाटील व सचिव डॉ.वर्षां मोरे पाटील यांनी दिली आहे.
डॉ. भास्करराव मोरे पाटील व वर्षा मोरे पाटील म्हणाले, मागील वर्षी कोरोना प्रादुर्भावाच्या पहिल्या टप्प्यात स्थानिक प्रशासनाने संस्थेच्या शैक्षणिक संकुलात कोवीड केअर सेंटर  व विलगीकरण कक्ष सुरू केले होते.
कोरोनाचा झपाट्याने वाढता प्रादुर्भाव पाहता जामखेड व कर्जत तालुक्यातील लोकांसाठी यावेळीही रत्नदीप मेडिकल फौंडेशन अँड रिसर्च सेंटर रत्नापूर या संस्थेमार्फत कोवीड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याठिकाणी पन्नास ऑक्सिजनयुक्त व पन्नास सर्व साधारण बेड व व्हेंटीलेटर उपलब्ध करण्यात येत असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ.भास्कर मोरे पाटील व सचिव डॉ.वर्षां मोरे पाटील यांनी दिली आहे. तसेच गरज भासल्यास अतिरिक्त बेड संख्या वाढविणे शक्य असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
    सध्या शहरात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांसाठी बेड शिल्लक नाहीत या आणीबाणीच्या प्रसंगी रत्नदीप मेडिकल फौंडेशनच्या वतीने चांगला समाजोपयोगी निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत परिसरातील नागरिकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here